महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर - governor Ramesh Bais

या घडामोडींवर असणार खास नजर

newstoday-14-july-2021-etv-bharat
NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर

By

Published : Jul 14, 2021, 4:34 AM IST

Updated : Jul 14, 2021, 5:07 AM IST

  • सांगलीत आजपासून कडक निर्बंध

मागील काही दिवसांपासून सांगली जिह्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्हाधिकारींनी १४ जुलै ते १९ जुलै या दरम्यान कडक निर्बंधाचे आदेश पारित केले आहेत. पॉझिटिव्ही दर १० टक्केपेक्षा कमी आणण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

  • दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांची १०१वी जयंती -

दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांची आज १०१ वी जयंती आहे. जयंतीनिमित्ताने आज राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या तीन दिवसांपासून कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आजपासून पुढील चार दिवस कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

  • आमदार सदाभाऊ खोत आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

माजी कृषी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. तसेच ते शेतकरी संवाद मेळाव्याचा माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत.

  • रमेश बैस आज घेणार शपथ

रमेश बैश आज झारखंडच्या राज्यपालपदाची शपथ घेतील. ते झारखंडचे १०वे राज्यपाल ठरणार आहे. हा शपथविथी सोहळा राजभवन परिसरात पार पडणार आहे. झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश रवि रंजन रमेश बैस यांना शपथ देतील. ७४ वर्षीय रमेश बैस हे त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यांची झारखंड राज्याच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली आहे.

  • महिला क्रिकेटमध्ये आज भारत-इंग्लंड आमनेसामने -

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात आज तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना खेळला जाणार आहेत. सद्य घडीला मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. दोन्ही संघ आजच्या सामन्यासह मालिका विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरतील. उभय संघातील या सामन्याला भारतीय वेळेनुसार, सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटाला होणार आहे.

  • अभिनेता दर्शनची पत्रकार परिषद

कन्नड अभिनेता दर्शन आणि निर्माते उमापाथी यांची आज संयुक्त पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. आज दोघेही नव्या चित्रपटाविषयी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • मध्य प्रदेश दहावी बोर्डाचा आज निकाल

मध्य प्रदेश दहावी बोर्डाचा आज निकाल घोषित होणार आहे. हा निकाल बोर्डाची अधिकृत संकेतस्थळावर पाहाता येणार आहे.

Last Updated : Jul 14, 2021, 5:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details