चेंगलपट्टू (तामिळनाडू) - सध्या सर्वत्र महागाई ही गगनाला भिडली आहे. पेट्रोल डिझेलच्या दरांनी तर मागील काही दिवसांपासून नवनवे शिखर गाठायला ( Petrol diesel Price Hike ) सुरूवात केली आहे. यातून सर्वसामान्याच्या खिश्याला चांगलीच झळ लागली आहे. या वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमती पाहून तामिळनाडू राज्यातील एका नवविवाहित जोडप्याला लग्न समारंभात त्यांच्या मित्रांनी पेट्रोल आणि डिझेलच्या बाटल्या भेट दिल्या ( Married Couple Gifted Petrol bottles ) आहेत. या संदर्सभात एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Married Couple Gifted Petrol bottles : नवविवाहित जोडप्याला लग्न समारंभात मित्रांनी भेट दिल्या पेट्रोल आणि डिझेलच्या बाटल्या - gifted bottles of petrol and diesel
सध्या सर्वत्र महागाई ही गगनाला भिडली आहे. पेट्रोल डिझेलच्या दरांनी तर मागील काही दिवसांपासून नवनवे शिखर गाठायला सुरूवात केली आहे. यातून सर्वसामान्याच्या खिश्याला चांगलीच झळ लागली आहे. या वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमती पाहून तामिळनाडू राज्यातील एका नवविवाहित जोडप्याला लग्न समारंभात त्यांच्या मित्रांनी पेट्रोल आणि डिझेलच्या बाटल्या भेट दिल्या ( Married Couple Gifted Petrol bottles ) आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या बाटल्या भेट - तमिळनाडूतील चेंगलपट्टू जिल्ह्यातील चेयुर गावात जोरात लग्न समारंभ सुरू होता. या लग्न समारंभापेक्षा या लग्नात नवरदेव नवरीला मिळालेल्या एका भेटीच चर्चा सर्वाधिक होत आहे. नवविवाहित जोडप्याच्या मित्रांनी लग्नात त्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या बाटल्या भेट दिल्या ( Petrol diesel bottle gifted in tamil nadu ) आहेत. तमिळनाडूत सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर 110.85 रुपये आणि 100.94 रुपये प्रतिलिटर आहेत.
हेही वाचा -नारळ काढण्यासाठी झाडावर चढला आणि वरच अडकला; खाली काढण्यासाठी बोलावे लागले जवानांना, पाहा Video