१ जानेवारी २०२३ (New Year 2023) पासून म्हणजे आजपासून तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होणार आहेत आणि या बदलांबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण हे बदल थेट तुमच्या खिशावरही परिणाम (Rules Changes) करू शकतात. हे बदल क्रेडिट कार्ड, बँक लॉकर, जीएसटी ई-इनव्हॉइसिंग, स्वयंपाकाचा गॅस, ऑटोमोबाईल इत्यादी क्षेत्रात होणार आहेत. एवढेच नाहीतर जर का तुम्ही नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल तरी देखील 2022 मध्ये तुम्ही ठरविलेल्या बजेट पेक्षा तो बजेट 2023 मध्ये काही पटीने नक्की वाढणार आहे. New Year Rules Changes 2023
तर बँक जबाबदार :बँकांमध्ये महागड्या वस्तु ठेवण्याबाबत आरपीआयच्या वतीने नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. यानुसार बँकांना यापुढे ग्राहकांशी मनमानी करता येणार नाही. नव्या नियमानुसार बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे काही नुकसान झाले, तर त्यासाठी बँकेची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. यासाठी बँका ग्राहकांशी करारही करत आहेत. 31 डिसेंबर 2022 पर्यंत बँक आणि ग्राहकांमध्ये नवीन करार होईल.
क्रेडिट कार्डमध्येबदल:1 जानेवारीपासून क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू होत आहेत. त्यानुसार, क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंट्समध्ये बदल होईल, त्यामुळे क्रेडिट कार्डमधील उर्वरित रिवॉर्ड पॉइंट ३१ डिसेंबरपूर्वी वापरा.