महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 25, 2023, 9:55 PM IST

Updated : Feb 25, 2023, 10:02 PM IST

ETV Bharat / bharat

Umesh Pal Murder Case : प्रयागराजमधील उमेश पाल हत्याकांडाचा व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये दिवसाढवळ्या हत्याकांडाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये हल्लेखोर फिल्मी स्टाईलमध्ये गोळीबार, बॉम्बस्फोट करताना दिसत आहेत. आमदार राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल यांची काल हत्या करण्यात आली होती.

Umesh Pal Murder Case
Umesh Pal Murder Case

उमेश पाल हत्याकांडाचा व्हिडिओ व्हायरल

प्रयागराज : बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराच्या हत्येचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. धुमानगंज पोलीस स्टेशन हद्दीतील सुलेम सराय भागातला हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ घटनास्थळाजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा आहे. या व्हिडीओवरून हल्लेखोरांनी नियोजनबद्ध पद्धतीने उमेश पाल यांची दिवसाढवळ्या हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर अखिलेश यादव यांनीही ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद : सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाहतूक थांबताच पांढऱ्या वाहनातून 3 जण खाली उतरल्याचे दिसत आहे. यानंतर, ते राजु पाल हत्याकांडातील साक्षीदार उमेश पाल यांच्याकडे जातांना दिसत आहेत. येथे पोहोचल्यानंतर एका हल्लेखोराने उमेश पालवर लगेच गोळी झाडली. त्यामुळे उमेश पाल जमिनीवर कोसळले. त्याचवेळी एक पोलीस तात्काळ खाली जमिनीवर झोपतो तर, एक पोलीस गाडीतच रोहतो. गोळी झाडल्यानंतर उमेश पाल काळ्या कोटात घराच्या आतमध्ये पळतांना दिसत आहे. तोपर्यंत 3 लोक गोळीबार करत दुकानात जातांना दिसत आहेत.

नियोजित हत्या : त्याचवेळी एक आरोपी कारच्या आजूबाजूला बॉम्ब फेकतांना दिसत आहेत. त्यामुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. काही वेळातच सर्व हल्लेखोर उमेश पाल यांच्या घरातून बाहेर येत त्यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करतांना दिसत आहेत. त्याचवेळी बॉम्ब फेकणाराही त्यांच्यासोबत जातो. त्याचवेळी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक हल्लेखोर दुकानातील दुकानदाराकडून काहीतरी खरेदी करत आहे. त्याच्या साथीदारांनी हल्ला सुरू केल्यावर तोही त्यांच्यात सामील होतो. गोळीबार पाहताना दुकानदार आपले शटर बंद करतो. व्हिडिओमध्ये हेल्मेट घातलेला एक बदमाशही गोळीबार करताना दिसत आहे.

अखिलेश यादव यादव यांची टीका : यावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी लिहले आहे की, 'अलाहाबाद-बॉम्बस्फोट प्रकरणात भाजप सरकारने यूपीमध्ये शूटिंगला प्रोत्साहन दिले जात असल्याची बतावणी करु नये. अतिक अहमद विरुद्ध सुरू असलेल्या अपहरणाच्या खटल्यातील अंतिम युक्तिवादानंतर उमेश पाल शुक्रवारी घरी येत होता. उमेश पाल त्याच्या सालेम सराय येथील जीटी रोड हाऊसवर पोहोचताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात उमेश पाल यांचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर दोन पोलीस जखमी झाले.

हेही वाचा -CM Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सटकली, म्हणाले, माफिया को ‍मिट्टी में देंगे...

Last Updated : Feb 25, 2023, 10:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details