हैदराबाद - सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी नवनवीन शक्कल ( cyber crime hyderabad ) लढवितात. वनस्थलीपुरम पोलीस स्टेशन हद्दीत असाच चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. सायबर गुन्हेगाराने मनी ट्रान्सफरच्या दुकानदाराला 30 हजार रुपयांचा ( fake money transfer case hyderabad ) गंडा घातला आहे.
मनी ट्रान्सफरच्या दुकानात तरुण ( cybercrime case in vanasthalipuram ) दुकानात गेला. त्याने दुकान मालकाला 30 हजार रुपये त्वरित देण्याची विनंती केली. त्या बदल्यात डिजिटल पेमेंट अॅपद्वारे पैसे देणार ( fake digital payment app ) असल्याचे सांगितले. दुकान मालकाने हे मान्य केले. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी त्याला क्यूआर कोड दिला. तरुणाने क्यूआर कोड स्कॅन करून पैसे कट झाल्याचा दुकानदाराला संदेश दाखविला. त्यानंतर तरुणाने दुकानदाराला 30 हजार रुपये रोख देण्यास सांगितले. मात्र, दुकानमालकाने पैसे खात्यात ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आला नसल्याचे सांगून रोख रक्कम ( Hyderabad fake transfer fraud )दिली नाही.
किमान 15 हजार रुपये रोख देण्याची विनंती-मेसेज येईपर्यंत दुकान मालकाने तरुणाला काही वेळ थांबण्यास सांगितले. पण, तरुण पैसे देण्याची घाई करत होता. दुकान मालकाने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तरुणाने किमान 15 हजार रुपये रोख देण्याची दुकानदाराला विनंती केली. त्यालाही दुकानदाराने संमती दिली नाही. त्यानंतर तो तरुण दुकानातून निघून गेला. दुकान मालकाला वाटले की तो फसवणूक करण्यासाठी आला आहे. परंतु त्याने तक्रार केली नाही.
पैसे घेण्यासाठी तरुणाने केली घाई-पाच मिनिटांतच हा तरुण एनजीओच्या कॉलनीत असलेल्या दुसऱ्या मनी ट्रान्सफरच्या दुकानात गेला. तेथेही तरुणाने ३० हजार रुपये रोख मागितले. डिजिटल पेमेंट अॅपद्वारे पैसे ट्रान्सफर करणार असल्याचे त्याने दुकान मालकाला सांगितले. दुकान मालकाने पैसे देण्यास होकार दिला. तरुणाने क्यूआर कोड स्कॅन करून दुकान मालकाला त्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज दाखवला. दुकान मालकाने खाते तपासले असता पैसे जमा झाले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी तरुणाला काही काळ थांबण्यास सांगितले. मात्र घाईत कुठेतरी जायचे आहे, असे तरुणाने सांगितले.