नवी दिल्ली- वाहनांचे हस्तांतरण सुलभ होण्यासाठी केंद्र सरकारने नवीन सुविधा सुरू केली आहे. त्यासाठी वाहन मालकांना भारत सिरीज किंवा बीएच सिरीजमध्ये वाहनांची नोंदणी करावी लागणार आहे. याबाबतचे परिपत्रक केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने आज काढले आहे.
नवीन वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बीएच नोंदणीचा पर्याय मिळणार आहे. ज्या लोकांच्या नोकरीनिमित्त राज्ये बदलावी लागतात, त्यांना बीएच नोंदणीचा चांगला पर्याय असणार आहे. जर बीएच नोंदणीमध्ये वाहनाची नोंदणी केली तर दुसऱ्या राज्यात जाताना वाहन मालकांना नव्याने नोंदणी करावी लागणार नाही. यापूर्वी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहण्यासाठी गेलेल्या वाहन मालकांना वाहनांची नव्याने नोंदणी करावी लागत होती.
राज्य बदलले तरी वाहनांची करावी लागणार नाही पुनर्नोंदणी हेही वाचा-भाजपचे 50 टक्क्यांनी उत्पन्न वाढले आणि तुमचे? राहुल गांधींचा टोला
खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही करता येणार बीएच नोंदणी-
बीएच सिरीज नोंदणीसाठी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने 26 ऑगस्टला परिपत्रक काढले आहे. बीएच नोंदणी ऐच्छिक आहे. ही नोंदणी संरक्षण विभागातील कर्मचारी आणि इतर, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे कर्मचारी व खासगी कंपन्यांतील कर्मचारी यांना करता येणार आहे. चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये कार्यालये असणाऱ्या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही बीएच नोंदणी करता येणार आहे.
हेही वाचा-...तर चालू वर्षात डिसेंबर अखेर 18 वर्षांहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण होईल- इंडियन मेडिकल असोसिएशन
इलेक्ट्रिक वाहनांना नोंदणी शुल्कातून वगळले-
केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ नुसार वाहनांना नोंदणी प्रमाणपत्रासाठी व नुतनीकरणासाठी शुल्क भरावे लागते. या अधिनियमात दुरुस्ती करून बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना दिलासा देण्याचा निर्णय यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. हा निर्णय इलेक्ट्रिक मोबिलिटीला देण्यासाठी घेण्यात येत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतल्याचे म्हटले होते.