नवी दिल्ली:प्रीमियम ट्रेन्स (राजधानी एक्स्प्रेस, तेजस, शताब्दी, वंदे भारत आणि दुरांतो) मधील खानपान सेवा महाग झाली आहे. याचा अर्थ रेल्वेतील खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. मात्र, तिकीट बुक करताना तुम्ही ऑनलाइन जेवण ऑर्डर केले असेल, तर जुने दर लागू होतील. तुम्ही ट्रेनमध्ये अचानक जेवण ऑर्डर केले, तर तुम्हाला 50 रुपये जादा द्यावे लागतील. या दराला प्रवाशांनी विरोधही केला. आंदोलनानंतर सरकारने चहा-पाणी-कॉफीसाठी जुनेच दर कायम ठेवले ( new rate for food on premium trains ) आहेत.
२० रुपयांचा चहा ७० रुपयांना :नव्या नियमानुसार 20 रुपयांचा चहा 70 रुपयांना मिळणार होता. सेवा शुल्क म्हणून 50 रुपये जोडण्यात आले होते. मात्र, वादानंतर चहावरील सेवा शुल्क मागे घेण्यात आले आहे. पण नवा दर नाश्ता आणि फराळावर लागू असेल.
काय आहे नवीन दर-जर तुम्ही एसी-1 क्लाससाठी नाश्ता बुक केला असेल तर तुम्हाला 140 रुपयांऐवजी 190 रुपये द्यावे लागतील. एसी-2 आणि एसी-3 क्लासमध्ये तुम्हाला 105 रुपयांऐवजी 155 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी एसी-१ मध्ये २४५ रुपयांऐवजी २९५ रुपये मोजावे लागणार आहेत. AC-2 आणि AC3 मध्ये तुम्हाला 140 ऐवजी 190 रुपये द्यावे लागतील.