अनेक वर्षांच्या परकीय राजवटीने आमचा अभिमान हिरावून घेतला. आज भारताने ती वसाहतवादी मानसिकता मागे टाकली आहे. भारत ही लोकशाहीची जननी आहे. जागतिक लोकशाहीचाही तो पाया आहे. लोकशाही हे आपले संस्कार, कल्पना आणि परंपरा आहे. भारतासोबतच नवीन संसद भवन जगाच्या प्रगतीलाही हातभार लावेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. ९ वर्षात ११ कोटी शौचालये बांधली आहेत. भारतामुळे अनेक देशांना प्रेरणा मिळत आहे. भारताचे यश आगामी काळात अनेक देशांना प्रेरणादायी ठरेल. भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. गरिबीचे निर्मूलन होत आहे.
new parliament building inauguration : गरिबीचे निर्मूलन होताना भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे-पंतप्रधान मोदी
13:23 May 28
गरिबीचे निर्मूलन होताना भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे-पंतप्रधान मोदी
13:10 May 28
लोकशाही फक्त व्यवस्था नाही, तर पंरपरा, संस्कारही- पंतप्रधान नरेंद्र मोदी
पवित्र सेंगोलला पुन्हा पावित्र्य मिळून दिले आहे. आपली लोकशाही हीच आपली प्रेरणा आहे.संसदेने देशाला नवीन दिशा देण्याचे काम केले आहे. वेदांनी आम्हाला लोकशाहीचा संस्कार दिला आहे. लोकशाही व्यवस्था नाही. तर परंपरा असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
13:00 May 28
नवी संसद जुन्या व नवीन गोष्टींचा संगम होईल-पंतप्रधान
अमृत काळात देशाला मोठी भेट मिळाली आहे. स्वातंत्र्यसेनांनींचे स्वप्ने साकार करणार आहोत. हे केवळ भवन नसून जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. ही संसद जुन्या व नवीन गोष्टींचा संगम होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
12:12 May 28
पंतप्रधान थोड्याच वेळात नवीन संसद भवनातून देशवासियांना करणार संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळ व खासदार हे नवीन संसदेत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात पंतप्रधान देशवासियांना संबोधित करणार आहेत.
08:33 May 28
केंद्रीय सचिवालय आणि उद्योग भवन मेट्रोकडे येणारे रस्ते बंद
दिल्लीत नवीन संसद भवनाच्या उद्धाटन समारंभापूर्वी दिल्ली पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. दुसरीकडे दिल्ली परिसरातील रस्ते सील करण्यात आले आहे. केंद्रीय सचिवालय आणि उद्योग भवन मेट्रो स्थानकांकडे येणारे सर्व प्रवेशमार्ग व बाहेर पडण्याचे मार्ग प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. केंद्रीय सचिवालय येथे इंटरचेंज सुविधा उपलब्ध आहेत. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन गाझीपूर सीमावर्ती भागाजवळ सुरक्षा कडक ठेवण्यात आली आहे. खाप पंचायतीचे नेते, शेतकरी आज दिल्लीतील नवीन संसद भवनापर्यंत कुस्तीपटूंच्या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून काळजी घेण्यात येत आहे.
08:18 May 28
सर्वधर्मीयांच्या प्रार्थनेला पंतप्रधान मोदी, कॅबिनेट मंत्री उपस्थित
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि कॅबिनेट मंत्र्यांसह पंतप्रधान मोदी नवीन संसद भवनात आयोजित 'सर्व-धर्म' प्रार्थना समारंभाला उपस्थित आहेत.
08:06 May 28
नवीन संसद भवनाचे लोकार्पण झाल्यानंतर मंत्रोच्चार-पूजापाठ सुरू
नवीन संसद भवनाचे लोकार्पण झाल्यानंतर सर्वधर्मीयांची प्रार्थना व पूजा सुरू झाली आहे.
08:01 May 28
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसद भवनाचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसद भवनाचे लोकार्पण करण्यात आले आहे. लोकार्पण झाल्यानंतर भवन करण्याची उभारणी कामगारांचा सन्मान मोदींच्या हस्ते करम्यात आला आहे.
07:56 May 28
सेंगोलची स्थापना केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संतांचे घेतले आशिर्वाद
पंतप्रधान मोदींच्या हस्ते सेंगोलची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी मोदींसोबत लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्लादेखील उपस्थित आहेत. मोदींना सेंगोलच्या स्थापना केल्यानंतर उपस्थित संत-महतांचे आशीर्वाद घेतले आहेत.
07:51 May 28
संंगोल घेऊन पंतप्रधान मोदी नव्या संसदेत दाखल
संत महंतासमोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल झाले. त्यांनी संसद भवनात कलश पूजन केले. मोदींच्या हस्ते थोड्याच वेळात सेंगोलची स्थापना होणार आहे.
07:39 May 28
new parliament building inauguration : नवीन संसदेचे आज उद्घाटन होणार
नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा सुरू आहे. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्लादेखील उपस्थित आहेत.