नवी दिल्ली : गूगल असिस्टंटसाठी ( Google assistant ) मुलांचा शब्दकोश देखील जोडत आहे जो स्पीकर, स्मार्ट डिस्प्ले आणि मोबाईल डिव्हाइसवर वयानुसार उत्तरे देईल. नाईन टू फाय गूगलच्या ( 9to5Google report ) अहवालानुसार, नवीन पालक नियंत्रण अपडेट पालकांना निवडू देईल की मुले कोणती संगीत आणि व्हिडिओ सेवा वापरू शकतात.
टेक दिग्गज गूगल :टेक दिग्गज गूगल आता विद्यार्थी दशेतील मुलांना आणि त्यांच्या पालकांसाठी खास अपडेट घेऊन आले आहेत. गूगल 'गूगल असिस्टंट' डिव्हाइसमध्ये नवीन पालक नियंत्रणे तसेच नवीन मुलांसाठी अनुकूल आवाज आणि शब्दकोश आणणार आहे. नाईन टू फाय गूगलच्या ( 9to5Google report ) अहवालानुसार, नवीन गुगल असिस्टंट पॅरेंटल कंट्रोल्स असणार आहे. पालक त्यांच्या मुलांवर चांगल्या प्रकारे लक्ष ठेऊ शकतात. मुलांनी कोणत्या प्रकारचे संगीत ऐकावे आणि व्हिडिओ पाहावेत यावर पालक कंट्रोल्स करू शकतात.
येत्या आठवड्याभरात अपडेट :गूगल येत्या आठवड्याभरात Android आणि iOS साठी गूगल असिस्टंट, गूगल होम आणि फॅमिली लींक या अॅप्सद्वारे ही सुविधा गूगल उपलब्ध करून देणार आहे. ते तुमच्या मुलाच्या खात्यासाठी असिस्टंट सेटिंग्जमध्ये उपलब्ध असेल. गूगल असिस्टंट हा वीविध स्तरावर काम करणार आहे. मुलांचा शब्दकोश ( kids dictionary )वाढवण्यासाठी ते स्पीकर, स्मार्ट डिस्प्ले आणि मोबाइल डिव्हाइसवर उत्तरे देईल. वयानुसार ते उत्तरे देईल.
गूगल आवाज बदणार :याशिवाय हे डिव्हाईज मुलांना विविध आवाजांची शैलीही उपलब्ध करून देतात. मुले किंवा पालक ते त्यांच्या सोयीनुसार बदलू (kids friendly voice ) शकतात. आवाजातील चढ उतार वाढवायचा असेल तर तोही ऑप्शन गूगलने दिला आहे. 'हे गूगल तुमचा आवाज बदला' असे विचारल्यास गूगल आपला आवाज बदलेला. त्यामुळे मुालंना एखादी गोष्ट समजून घेण्यास मदत होऊ शकते. हळू आणि अधिक अर्थपूर्ण शैलीत गूगल बोलू शकते. मुले विविध पर्यायांमधून त्याची निवड करू शकतात. दरम्यान, गेल्या महिन्यात गूगलने फॅमिली लींकसाठी नवीन अपडेट जाहीर केले होते. ज्याने अनेक पर्याय ऑफर उपलब्ध झाले होते. कुटुंबांना ऑनलाइन रित्या सुरक्षित ठेवण्यास मदत केली जाते.