महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NCERT X syllabus : एनसीआरटीकडून दहावीच्या अभ्यासक्रमात लोकशाहीसह उत्कांतीच्या अभ्यासाला कात्री, शिक्षणतज्ज्ञांकडून चिंता व्यक्त - उत्कांती एनसीईआरटी

विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्याच्या नावाखाली राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदने (NCERT) ने दहावीच्या अभ्यासक्रमातून महत्त्वाचा भाग वगळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनसीईआरटीने नियतकालिक सारणी, लोकशाही आणि ऊर्जा स्त्रोत हे महत्त्वाचे दहावीच्या अभ्यासक्रमातून वगळले आहेत. दहावीच्या अभ्यासक्रमातून उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वगळण्यात आल्याने एनसीईआरटीवर शिक्षणतज्ज्ञांमधून टीका केली आहे.

NCERT X syllabus
एनसीईआरटी नवीन अभ्यासक्रम

By

Published : Jun 2, 2023, 9:48 AM IST

नवी दिल्ली: एनसीईआरटीने म्हटले आहे की दहावीच्या अभ्यासक्रमातून हटवलेले भाग स्वयंअध्ययन सहज समजू शकतात. शैक्षणिक परिषदेने म्हटले की कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर हटविणे आवश्यक होते. अत्यंत अवघड आणि असंबद्ध वाटणारे भाग नवीन अभ्यासक्रमातून वगळण्यात आले आहेत.

विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून नियतकालिक वर्गीकरण ( Periodic table) , ऊर्जा स्त्रोत आणि नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन वगळले आहेत. सामाजिक अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकात, लोकशाही राजकारण-I मधील तीन प्रकरणे वगळण्यात आली आहेत. यात लोकप्रिय संघर्ष आणि चळवळी, राजकीय पक्ष आणि लोकशाहीसमोरील आव्हाने यांचा समावेश आहे. विज्ञान शाखेची निवड करणारे विद्यार्थ्यांना दहावीनंतरच रसायनशास्त्राच्या आवर्त सारणीचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे भूगोलाची निवड करणारे विद्यार्थी अकरावी आणि बारावीच्या वर्गात हे भाग शिकणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसमोर शिकण्यासाठी अडचणी निर्माण होणार असल्याचे शिक्षणतज्ञांनी सांगितले.

विद्यार्थी वेबसाईटवरून शिकू शकतात-दहावीच्या पाठ्यपुस्तकातून उत्क्रांतीचा सिद्धांत वगळल्यानंतर एनसीईआरटीने शिक्षणतज्ज्ञांकडून टीका केली होती. या निर्णयावर चिंता व्यक्त करत 1,800 हून अधिक शिक्षकांनी परिषदेला खुले पत्र लिहिले होते. केंद्र सरकारने हा अपप्रचार असल्याचा आरोप करत शिक्षणतज्ज्ञांचे आरोप फेटाळून लावले होते. डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताविषयी जाणून घेण्यास उत्सुक असलेले विद्यार्थी वेबसाइटवरून ही गोष्ट वेबसाईटवरून किंवा बारावीत शिकू शकणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

यापूर्वीही वगळले धडे-पुस्तकामधील अभ्यासक्रम कमी करण्यासाठी एनसीईआरटीने यापूर्वी इयत्ता सहावी, सातवी आणि आठवीमधील काही विषय वगळले आहेत. इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील महात्मा गांधी आणि चरखा आणि चरख्याचा संदर्भ वगळला आहे. इयत्ता नववीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात 'आपण आजारी का पडतो, यावरचा धडा वगळला आहे. यावर शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ब्रिटीश जीवशास्त्रज्ञ आणि 'द सेल्फिश जीन'चे लेखक रिचर्ड डॉकिन्स यांनी ट्विट करत म्हटले, की भाजप हा भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा अपमान करत आहे. तुम्ही आता कृती केली नाही, तर तुम्हाला अंधार युगात जावे लागेल, असा इशारा इंग्लंडस्थित फॉरेन्सिक मानववंशशास्त्र तज्ज्ञ डॉ. नम्रता दत्ता यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details