पणजी(गोवा): या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर गोव्याचे नाव पुन्हा एकदा बदनाम झाले असून नेदरलँडच्या दूतावासाने याची दखल घेतली आहे. या देशाचे अधिकारी गोव्यात दाखल झाले आहेत. छोट्या छोट्या राज्यात अशा गुन्ह्यांच्या घटना वाढत आहेत. अशा घटना घडू नये यासाठी गोवा सरकार आणि पर्यटन खाते याबाबतीत कडक पावले उचलणार आहेत. छोट्या राज्यात ज्यावेळी अशा घटना घडतात. परदेशी नागरिकांच्या सुरक्षितेचे पूर्ण काळजी भविष्यात घेतली जाणार. नेदरलँड युवतीवर या बलात्कार प्रकरणाचे पडसाद राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटल्यामुळे गोव्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम झाले आहे.
गोव्यात पर्यटनासाठी आली अन्: गोव्यात आगामी महिन्यात G-20 परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. हा मुद्दा G-20 परिषदेत उपस्थित झाल्यास गोव्याला फार मोठा फटका बसू शकतो, असे गोवा फॉरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. 29 वर्षीय नेदरलँडची रहिवासी असणारी युवती सोमवारी गोव्यात दाखल झाली. हे तरुणी भारत भ्रमणासाठी आली होती. मुंबईत काही दिवस काढल्यानंतर पुढील चार दिवस ती गोव्यात राहणार होती. दाबोली आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच तिने थेट उत्तर गोव्यातील माड्रे गाठले. तिथे तिला हॉटेलमध्ये असणाऱ्या तंबू पद्धतीच्या खोल्यांची भुरळ पडली आणि पुढील चार दिवसासाठी तिने या ठिकाणी हॉटेल बुक केले.