जोधपूर - लहान शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात भाजीपाला पिके घेता यावे, यासाठी जोधपूरच्या सेंट्रल एरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूटने ( Central Arid Zone Research Institute) पॉली हाऊसच्या धर्तीवर नेट हाऊस ( Net House ) विकसित केले आहे. या नेट हाऊसमध्ये कोणताही शेतकरी एका वर्षात भाजीपाल्याची ( Net House for vegetables ) 4 पिके घेऊ शकतो. ज्यामध्ये टोमॅटो, काकडी, सिमला मिरची या पिकांचा समावेश आहे. या नेट हाऊसचा संपूर्ण खर्च पहिल्या वर्षातच काढता येते. यानंतर शेतकरी पाच वर्षे भरपूर कमाई करू शकतो.
जोधपूर काजरी यांनी खासकरून राजस्थानची कडक उष्णता, जोरदार उष्ण वारे आणि इतर कारणे लक्षात घेऊन हे नेट हाऊस विकसित केले आहे. CAZRI चे भाजीपाला शास्त्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुमार सांगतात की, या नेट हाऊसमध्ये शेतकरी काकडीचे पीक जुलै ते ऑक्टोबर, टोमॅटो, सिमला मिरची, चेरी टोमॅटो सप्टेंबर ते एप्रिल या कालावधीत घेऊ शकतात. या नेट हाऊसची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. नेट हाऊसमध्ये 300 पेक्षा जास्त झाडे लावता येतात. डॉ. कुमार सांगतात, की आम्ही भाजीपाला पिकाचे मॉडेल विकसित केले आहे. कोणत्या महिन्यात कोणते पीक घेतले जाईल? नेट हाऊसचे डिझाईन विशेषतः लहान शेतकऱ्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचे ते सांगतात. यासाठी आम्ही पाच वर्षे काम केले. आता आम्ही ते शेतकर्यांमध्ये नेत आहोत. त्यानंतर शेतकरी त्यांच्या शेतात लागवड करून त्यांचे जीवनमान वाढवू शकतील.
नेट हाऊस आणि पॉली हाऊसमधील फरक :नेट हाऊस 8 मीटर रुंद, 16 मीटर लांब आणि सुमारे 4 मीटर उंचीचे असते. यामध्ये अडीच मीटर उंचीवर वायर टाकून झाडे स्थिर केली जातात. यामध्ये काकडी, टोमॅटो, सिमला मिरची आणि चेरी टोमॅटोचे पीक जुलै ते ऑक्टोबर, सप्टेंबर ते एप्रिल या काळात घेता येते. त्यात सिंचनासाठी स्प्रिंकलर ड्रिपिंग यंत्रणा आहे. पॉली हाऊस एक एकरमध्ये उभारले असून, त्याची किंमत सुमारे 40 लाख रुपये आहे. तर कमी देखभालीवर केवळ दीड लाख रुपयांमध्ये छोट्या ठिकाणी नेट हाऊस बसवता येते.