नेहा कक्करने( Neha Kekkar ) अलीकडेच फाल्गुनी पाठकच्या 90 च्या दशकातील आयकॉनिक मैने पायल है छनकाईचा रिमेक रिलीज केला. ओ सजना नावाच्या या गाण्याने नेटिझन्समध्ये खळबळ उडवून दिली आहे. काहींनी नवीन आवृत्तीबद्दल त्यांची नाराजीही शेअर केली, तर काहींनी पोस्ट केले की, त्यांना हे खूप आवडले आहे. नेहा कक्करने एका पोस्टमधून लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गाण्याच्या रिमेक व्हर्जनवर एका महिलेचा नाचतानाचा व्हिडिओ ( lady dancing on song ) तिने शेअर केला आहे. तिने एक सुंंदर शिर्षकही दिले आहे. तिने लिहिले की, या कामगिरीमुळे तिचे हृदय उल्हासित झाले होते.
Neha Kekkar नेहा कक्करने शेअर केला ओ सजना गाण्यावरील महिलेचा डान्स करतानाचा व्हिडिओ, होतोय प्रचंड व्हायरल
नेहा कक्करने ( Neha Kekkar ) इंस्टाग्रामवर एका महिलेचा व्हिडीओ ( lady dancing on song ) शेअर केला असून तिच्या ओ सजना या नवीन गाण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
Neha Kekkar
प्रेम प्रेम तुमच्या नृत्य आणि भावनेवर प्रेम करा @pranalimusic @dheerajpatilofficial आयुष्य भरभरून जगत रहा! जेव्हा मी लोकांना आनंदी पाहते तेव्हा मला खूप आनंद होतो. असे तिने लिहिले आणि व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती महिला आपल्या घराच्या छतावर अत्यंत आनंदात नाचत आहे. तिच्या नृत्या दरम्यान तिची मुल देखील व्हिडिओत गोड दिसते.