आज नीट युजी 2022 (NEET UG 2022) चा निकाल जाहीर होणार आहे. उमेदवार हा निकाल नीट युजी च्या अधिकृत वेबसाईटवर (Official Website) जाऊन तपासू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून आज 7 सप्टेंबर रोजी नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट-यूजी 2022) चा निकाल जाहीर करण्यात येण्यात आहे. ( NEET UG 2022 Result Today Where to download the scorecard )
NEET Result 2022: नीट यूजी परीक्षेचा निकाल आज, कसा आणि कुठे पाहाल? - NEET UG 2022 Result Today
नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा आज ( NEET 2022 ) चा निकाल जाहीर होणार आहे. तर उमेदवार निकाल नीट युजीच्या अधिकृत वेबसाईटवर (Official Website) पाहू शकतात. हा निकाल तपासण्यासाठी उमेदवार ntaresults.nic.in वेबसाइटला भेट देऊ शकतात. ( NEET UG 2022 Result Today Where to download the scorecard )
कसा पाहू शकाल निकाल
- एनईईटी यूजी निकाल तपासण्यासाठी, neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर तुम्हाला नीट रिझल्ट 2022 लिंक दिसेल.
- लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल.
- सर्व तपशील भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा
- आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर नीट यूजी रिझल्ट पाहता येईल.
- निकाल डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआऊट घ्या.
या आधी -नीट युजी ची आन्सर कि जाहीर करण्यात आली होती.आन्सर कि मुळे विद्यार्थ्यांना आपल्या स्कोअरचा अंदाज आधी आलेला आहे. आता आज अंतिम निकाल असेल. नीट यूजी परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती. नीट यूजी परीक्षेसाठी 18.72 लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. मात्र, केवळ ९५ टक्के विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विद्यार्थ्यांची संख्या 18 लाखांहून अधिक असण्याची ही पहिलीच वेळ आहे.18 लाखांहून अधिक उमेदवारांपैकी 10.64 लाख मुली होत्या. तर गेल्या वर्षी नीट युजी परीक्षेत 15.44 लाख उमेदवारांनी भाग घेतला होता. त्यापैकी 8.70 लाख उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते.