महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 6, 2021, 4:16 PM IST

ETV Bharat / bharat

नीटचे टेन्शन मिटले! यंदा जुन्याच पद्धतीनुसार होणार परीक्षा!

यावर्षी जुन्याच पद्धतीनुसार नीट परीक्षा घेतली जाणार आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सर्वोच्च न्यायालयात याविषयीची माहिती दिली आहे. नीटसाठीची नवीन पद्धत पुढील वर्षीपासून लागू केली जाणार आहे.

नीटचे टेन्शन मिटले! यंदा जुन्याच पद्धतीनुसार होणार परीक्षा!
नीटचे टेन्शन मिटले! यंदा जुन्याच पद्धतीनुसार होणार परीक्षा!

नवी दिल्ली : यावर्षी जुन्याच पद्धतीनुसार नीट परीक्षा घेतली जाणार आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सर्वोच्च न्यायालयात याविषयीची माहिती दिली आहे. नीटसाठीची नवीन पद्धत पुढील वर्षीपासून लागू केली जाणार आहे.

जानेवारीत होणार परीक्षा

यंदाची NEET SS परीक्षा ही जुन्या पद्धतीनुसारच घेतली जाणार आहे. परीक्षेसाठीची नवी पद्धत पुढील वर्षीपासून लागू होईल असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा पुढे ढकलली जाईल असे मंडळाने म्हटले होते. ही परीक्षा आता नोव्हेंबर ऐवजी जानेवारीत होणार आहे.

विद्यार्थ्यांना संधी मिळेल

नोव्हेंबरमध्ये ही परीक्षा होणार होती आणि ऑगस्ट महिन्यात परीक्षेच्या पद्धतीत बदल करण्यात आला होता. यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले होते. आता ही परीक्षा नोव्हेंबरऐवजी जानेवारीत होईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना नवीन पॅटर्ननुसार तयारी करण्याची संधी मिळेल असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.

NBE कडून मागविले उत्तर

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (NBE) अचानक जाहीर केलेल्या बदलांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. सत्तेच्या खेळात या तरुण डॉक्टरांना फुटबॉल समजू नका असे न्यायालायने म्हटले होते. दरम्यान, 12 सप्टेंबर 2021 रोजी कथित पेपर लीक आणि गैरप्रकारामुळे NEET-UG ची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती.

हेही वाचा -#NEET परीक्षेत ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार!

ABOUT THE AUTHOR

...view details