महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NEET PG 2021 exam 11 सप्टेंबरला होणार- मनसुख मांडवीय - नीट पदव्युत्तर परीक्षा

नीटची पदव्युत्तर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत नीटची पदव्युत्तर परीक्षा 11 सप्टेंबरला होणार असल्याचे म्हटले आहे.

मनसुख मांडवीय
मनसुख मांडवीय

By

Published : Jul 13, 2021, 6:48 PM IST

Updated : Jul 13, 2021, 7:05 PM IST

नवी दिल्ली - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (नीट) आवश्यक असते. ही नीटची पदव्युत्तर परीक्षा (NEET Postgraduate exam) 11 सप्टेंबरला होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करून दिली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत नीटची पदव्युत्तर परीक्षा 11 सप्टेंबरला होणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचे ट्विट

देशातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अधिक डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे. ही स्थिती पाहता वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (नीट-पीजी) परीक्षा 3 मे 2021 मध्ये चार महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली होती. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत घेतला होता.

हेही वाचा-सूरत : जामिनानंतर दारूमाफियाने काढली महागड्या गाड्यांची रॅली; व्हिडिओ व्हायरल

यापूर्वीही 15 एप्रिलला ढकलण्यात आली होती परीक्षा-

यापूर्वी ही परीक्षा 15 एप्रिल रोजी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मोहीम चालविली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगोदरच देशभरतील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी अंतिम सत्राच्या परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थी संभ्रमात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (नीट) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा-यूपीत मारहाणीचे चित्रीकरण करताना युवकाला लागली गोळी, VIDEO व्हायरल

नीट (युजी) 2021 12 सप्टेंबरला होणार-

नीट (युजी) 2021 ही परीक्षा 12 सप्टेंबर 2021ला देशभरात होणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 12 जुलैला केली आहे. कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करून ही परीक्षा घेतली जाणार आहे. नीट (युजी) 2021 परीक्षेच्या अर्ज प्रक्रिया 13 जुलैला सायंकाळी एनटी वेबसाईटवरून सुरू होणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर फेस मास्क दिले जाणार आहेत.

हेही वाचा-NEET UG exam १२ सप्टेंबरला होणार; प्रत्येक विद्यार्थ्याला दिला जाणार मास्क- धर्मेंद्र प्रधान

Last Updated : Jul 13, 2021, 7:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details