महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tufail cracks NEET 2022 : कठीण परिस्थितीवर मात करत जम्मू-काश्मीरमधील पहिला आदिवासी तरुण NEET उत्तीर्ण - श्रीनगर पहिला आदिवासी तरुण नीट उत्तीर्ण

श्रीनगरमध्ये (Srinagar) मुलनार हरवान नावाचे एक ठिकाण आहे. या दुर्गम भागातील एका आदिवासी तरुणाने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा 2022 उत्तीर्ण (NEET 2022) केली आहे. यशाची पताका फडकवणाऱ्या या तरुणाचा कुटुंबासह समाजाला अभिमान वाटत आहे. विशेष म्हणजे तुफैल हा श्रीनगरमधील पहिला आदिवासी तरुण आहे ज्याने NEET परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तुफैल अहमद (NEET 2022 Tufail Ahmad first tribal) असे त्या आदिवासी तरुणाचे नाव आहे.

Tufail cracks NEET
तुफैल अहमद

By

Published : Feb 21, 2022, 8:55 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये (Srinagar) मुलनार हरवान नावाचे एक ठिकाण आहे. या दुर्गम भागातील एका आदिवासी तरुणाने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा 2022 उत्तीर्ण (NEET 2022) केली आहे. यशाची पताका फडकवणाऱ्या या तरुणाचा कुटुंबासह समाजाला अभिमान वाटत आहे. विशेष म्हणजे तुफैल हा श्रीनगरमधील पहिला आदिवासी तरुण आहे ज्याने NEET परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तुफैल अहमद (NEET 2022 Tufail Ahmad first tribal) असे त्या आदिवासी तरुणाचे नाव आहे.

  • शाळेसाठी अनेक किलोमीटर पायी प्रवास -

तुफैलने इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण मिशन स्कूल न्यू थेड हरवान श्रीनगर येथून पूर्ण केले. त्यानंतर 12वी पर्यंतचे शिक्षण त्याने शालीमार येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयातून पूर्ण केले आहे. NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तुफैल अहमद सांगतो की, मला जीवनात खूप संघर्ष आणि अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनेक मूलभूत सुविधांपासून मी वंचित होतो. इंटरनेट वापरण्यासाठी आणि शाळेत जाण्यासाठी अनेक किलोमीटर चालत जावे लागत होते.

  • पुस्तकं खरेदीसाठी पैसे नसायचे -

तुफैल सांगतात की, इंटरनेट वापरण्यासाठी मला श्रीनगरला जावे लागायचे. तिथे अभ्यासासंदर्भातले व्हिडिओ इंटरनेटवरून डाऊनलोड करून ते घरी आल्यावर ऐकायचे, पाहायचे आणि त्यातून अभ्यास करावा लागायचा. तसेच शाळेत असताना पुस्तकं घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून मी शिक्षण पूर्ण केले आहे.

NEET परीक्षेसाठी प्रेरणा कुठून मिळाली? या प्रश्नाचे उत्तर देताना तुफैल याने सांगितले की, आदिवासी भागातून मी येत असल्यामुळे अऩेक समस्यांचा सामना केला आहे. त्यामुळे या कठीण परिस्थितीनेच मला प्रेरणा दिली आहे. अशी परिस्थिती इतर आदिवासी विद्यार्थ्यांवर येऊ नये यासाठी मी काम करेल, असे तो सांगतो.

  • अशिक्षित आईने दिली साथ -

श्रीनगरमधील मुलनार हरवान हा भाग आदिवासी बहुल आहे. त्यामुळे येथे लाईट, इंटरनेटसह अनेक इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे अशा भागातील लोकांसाठी काहीतरी करण्याची माझी जिद्द होती. यासाठी मला माझा भाऊ आणि अशिक्षित आईने मोलाची साथ दिली आहे.

तुफैल अहमदच्या आधी जम्मू-काश्मीरमधील शाह फैसल हा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. या यशानंतर तुफैल हा आता अनेत आदिवासी युवकांसाठी रोलमॉडल ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details