ऍथलेटिक्समध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्रावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. हरियाणामध्ये नीरज चोप्राच्या घरासमोर जल्लोषाचे वातावरण आहे. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
जवानांनी तिरंगा फडकवत साजरा केला आनंद
नीरज चोप्राने भालाफेकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकल्यानंतर सीआरपीएफ जवानांनी जम्मूमध्ये आनंद साजरा केला आहे.