ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्राचा ( Neeraj Chopra ) जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ( World Championship ) अंतिम फेरीत ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सशी सामना झाला. यामध्ये नीरजने 88.13 मीटर भालाफेक करून रौप्य पदक ( Silver Medal ) मिळविले, तर पीटर्सने 90 मीटरपेक्षा लांब भालाफेक करत सुवर्णपदक प्राप्त केले. या कामगिरीनंतर नीरजने देशवासियांचे आभार मानत देशासाठी पदक जिंकणे ही अभिमानाची बाब असल्याचे म्हटले आहे.
अँडरसन पीटर्सने90.54 मीटर अंतर भाला फेकला. त्याचवेळी, हेवर्ड फील्ड येथे झालेल्या अंतिम फेरीत चोप्राने 88.13 मीटर अंतरावर भालाफेक केली. टोकियो 2020 चा रौप्यपदक विजेता जेकब वडलेजने 88.09 मीटर अंतर भालाफेक करीत कांस्यपदक जिंकले.