महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नीरज चोप्रा : लठ्ठ मुलगा ते वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारा ऑलिम्पिकचा चॅम्पियन

नीरजने काही मोठी मुले भालाफेक करताना पाहिले. तेव्हा त्याला धावण्यात नव्हे तर जेव्हेलिन भालाफेकमध्ये रस निर्माण झाला. त्याने भालाफेकमध्ये नशीब अजमावून पाहण्याचा प्रयत्न केला, आज त्याने निर्माण केलेला इतिहास आज जग पाहत आहे.

Neeraj Chopra struggle story
Neeraj Chopra struggle story

By

Published : Aug 7, 2021, 8:42 PM IST

नवी दिल्ली - बालपणी लठ्ठ मुलगा ते अॅथिलिटिकमध्ये वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारा खेळाडू.. मात्र, त्याने देशाला अॅथिलिटिकमध्ये पहिले ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. ही स्टोरी काल्पनिक वाटत असली तरी खरीखुरी आहे. 23 वर्षाचा नीरज चोप्रा हा आज सुपरस्टार ठरला आहे. कित्येक वर्षे अॅथिलिटक भारताकरिता सुवर्णपदकाची वाट पाहत होते. हे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.

धावण्यात नव्हे तर जेव्हेलिन भालाफेकमध्ये होता नीरज चोप्राला रस

अनेक वर्षांपासून नीरज चोप्रा हा अनेक वर्षांपासून वजन कमी करण्यासाठी दबावाखाली होता. त्याच्या कुटुंबात एकूण 17 जण आहेत. नीरज हा 13 वर्षांपासून खोडकर मुलगा होता. अनेकदा तो झाडावर चढून मधमाशांचे पोळे काढायचा. तर कधी म्हशींच्या शेपटी खेचायचा. त्याचे वडिल सतिश कुमार चोप्रा यांना आपला मुलगा हा शिस्तबद्द व्हावा, अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी धावण्यासाठी पानीपतमधील शिवाजी स्टेडियमवर त्याच्या काकाबरोबर पाठविण्यास सुरुवात केली. हे स्टेडियम त्यांच्या गावापासून 15 किमी दूर होते. नीरजने काही मोठी मुले भालाफेक करताना पाहिले. तेव्हा त्याला धावण्यात नव्हे तर जेव्हेलिन भालाफेकमध्ये रस निर्माण झाला. त्याने भालाफेकमध्ये नशीब अजमावून पाहण्याचा प्रयत्न केला, आज त्याने निर्माण केलेला इतिहास आज जग पाहत आहे. कदाचित, येणाऱ्या काळात नीरज चोप्राचा धडा विद्यार्थ्यांना अभ्यासण्यासाठीही येणार आहे.

हेही वाचा-Tokyo Olympics: नीरज चोप्राने सुवर्ण जिंकत दिवंगत मिल्खा सिंगची शेवटची इच्छा पूर्ण केली

नीरज चोप्राची कामगिरी

  • 2016 मध्ये ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 2016 ला ऐतिहासिक कामगिरी केली.
  • 20 वर्षाखाली गटात त्याने 86.8 मीटरचा विक्रम केला. हा विक्रम अद्याप कोणीही मोडला नाही.
  • कॉमन्वेल्थमध्ये 2018 ला त्याने सुवर्णपदक मिळविले. तर 2017 मध्ये एशियन चॅम्पियनशिपमध्ये यश मिळविले.
  • चोप्राला 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.
  • नीरज चोप्राने 2013 मध्ये युक्रेनमधील वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला. मात्र, कोणत्याही पदकाविना तो परतला.
  • दुसऱ्याच वर्षी त्याने बँकॉकमधील युथ ऑलिम्पिक्सच्या पात्रता फेरीत पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळविले.

त्याच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर 2019 मध्ये ऑर्थोपोडिक सर्जरी करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षभर नीरजला खेळापासून दूर राहावे लागले. त्यानंतर नीरजने पुन्हा उत्कृष्ट खेळीसाठी प्रयत्न सुरू केले. आयुष्यात चढ-उतार आले तरी नीरज हा नम्र अॅथिलिट म्हणून ओळखला जातो. जेव्हेलिन भालाफेक जयवीर चौधरी यांनी नीरजचे खेळातील कौशल्य पाहून त्याला 2011 मध्ये गावातून शहरात आणले.

हेही वाचा-Golden Boy Neeraj Chopra : सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने दिली 'ही' प्रतिक्रिया

भारतीय सैन्यदलाने 2017 मध्ये दिली नायब सुभेदार पदावर नियुक्ती

भारतीय सैन्यदलाने नीरज चोप्राला 2017 मध्ये नायब सुभेदार पदावर नियुक्ती दिली. त्यानंतर चोप्राने दिलेली प्रतिक्रिया त्याच्या जीवनसंघर्षाची कल्पना देते. त्यावेळी नीरज चोप्रा म्हणाला होता, की आम्ही शेतकरी आहोत. आमच्या कुटुंबातील कोणालाही सरकारी नोकरी नाही. माझ्या कुटुंबाने कठीण काळात मला मदत केली आहे. मात्र, आता दिलासा मिळाला आहे. मी माझ्या कुटुंबाला प्रशिक्षण सुरू असतानाही आर्थिक मदत करू शकतो.

हेही वाचा-Tokyo Olympics: भारताचे राष्ट्रगीत ऐकताच नीरज चोप्रा झाला भावूक, व्हिडिओ होतोय व्हायरल

एका कल्पनेने बदलले आयुष्य

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणे हे माझे उद्दिष्ट आहे. अॅथिलिटचे हे अंतिम उद्दिष्ट आहे. मी अजूनही तरुण आहे. अजून सर्वोत्तम कामगिरी व्हायची आहे. त्याच्या घरातील बेडरुममध्ये सुंदर विचार लिहिलेला आहे. एक कल्पना तुमचे आयुष्य उजाळून टाकते. भालाफेकीची कल्पना नीरजने पाहिली. याच कल्पनेने भारताला सुवर्णपदकाची चकाकी मिळवून दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details