झुरिच: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने ( Golden Boy Neeraj Chopra ) प्रतिष्ठित डायमंड लीग फायनलचे विजेतेपद जिंकून आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली. हे विजेतेपद पटकावणारा चोप्रा पहिला भारतीय खेळाडू ठरला ( Diamond League Final won by Neeraj Chopra ) आहे. चोप्राने फाऊलने सुरुवात केली, पण दुसऱ्या प्रयत्नात 88.44 मीटर फेकून त्याने अव्वल स्थान गाठले. त्याच्या कारकिर्दीतील ही चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे, ज्याने त्याला सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने पुढील चार प्रयत्नांमध्ये 88.00 मीटर, 86.11 मीटर, 87.00 मीटर आणि 83.60 मीटर भाला फेकला.
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता झेक प्रजासत्ताकच्या जेकोब वडलागेने ( Olympic silver medalist Jakob Wadlage ) 86.94 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरे स्थान पटकावले. चौथ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळवले. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 83.73 मीटरसह तिसरे स्थान पटकावले. नीरज नंतर म्हणाला, आज वडलेगेसोबतची स्पर्धा खूप चांगली झाली. त्याने चांगले थ्रोही केले. मी आज 90 मीटर भालाफेक करेन अशी अपेक्षा होती. पण मला आनंद आहे की आता माझ्याकडे डायमंड लीगची ट्रॉफी आहे आणि हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हे देखील महत्त्वाचे आहे, कारण येथून माझे कुटुंब माझ्यासोबत आहे.
तो म्हणाला, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ते माझ्यासोबत आले आहेत. कारण ही माझी शेवटची स्पर्धा आहे आणि त्यानंतर आम्ही पॅरिसला सुट्टीवर जाऊ. नीरज म्हणाला, युजेनला दुखापत झाली असून मला दोन ते तीन आठवडे विश्रांतीची गरज आहे. त्यानंतर मी रिहॅब करेन आणि पुढच्या वर्षासाठी तयार होईन. भारताचा हा 24 वर्षीय खेळाडू आता ऑलिम्पिक चॅम्पियन, वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता आणि डायमंड लीग चॅम्पियन आहे. अवघ्या 13 महिन्यांत त्यांनी हे सर्व यश संपादन केले आहे. त्याने गेल्या वर्षी 7 ऑगस्ट रोजी टोकियो येथे ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले होते.