महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Lausanne Diamond League 2022 नीरज चोप्रा लॉसने डायमंड लीगमध्ये सहभागी होणार, ट्विट करुन दिली माहिती - भालाफेकपटू नीरज चोप्रा

गेल्या महिन्यात यूजीन, यूएसए येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान नीरज चोप्राला Neeraj Chopra कंबरदुखीचा त्रास झाला होता. दुखापतीमुळे त्याने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली होती. आता तो लॉसने डायमंड लीग 2022 Lausanne Diamond League 2022 मध्ये सहभागी होणार आहे.

NEERAJ CHOPRA
नीरज चोप्रा

By

Published : Aug 24, 2022, 12:46 PM IST

नवी दिल्ली टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा Tokyo Olympic Champion Neeraj Chopra याने लॉसने डायमंड लीग 2022 मध्ये आपला सहभाग निश्चित केला Neeraj Chopra confirms participation in LDG 2022 आहे. अनुभवी भालाफेकपटू नीरज चोप्राने दुखापतीमुळे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली होती. यानंतर त्याच्या लॉसने डायमंड लीगमध्ये खेळण्याबाबत शंका निर्माण झाली होती, मात्र नीरजने स्वतः ट्विट करून तो खेळणार असल्याची माहिती दिली आहे.

नीरज चोप्रा Neeraj Chopra tweet 26 ऑगस्ट रोजी लॉसने डायमंड लीगमध्ये Lausanne Diamond League 2022 भाग घेण्यासाठी सज्ज झाला आहे. नीरजने ट्विटरवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात कॅप्शन आहे की, “शुक्रवारसाठी मजबूत आणि तयार वाटत आहे. पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार, लॉसनेमध्ये भेटू!

यापूर्वी, अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने AFI स्पष्ट केले होते की, नीरजला Javelin thrower Neeraj Chopra वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित केले गेले, तरच तो सहभागी होऊ शकतो. एएफआयचे अध्यक्ष आदिले सुमारीवाला AFI President Adile Sumariwala Statement म्हणाले होते की, नीरज या लीगमध्ये खेळणार की नाही याचा निर्णय त्याच्या फिटनेसवरुन घेतला जाईल. वैद्यकीय अहवालात तंदुरुस्त आढळले तरच लुसाने डायमंड लीगमध्ये सहभागी होईल, असे अध्यक्षांनी सांगितले होते. गेल्या महिन्यात यूजीन, यूएसए येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपदरम्यान चोप्राला कंबरदुखीचा त्रास झाला होता. तेथे त्याने रौप्य पदक जिंकले.

हेही वाचा -Sania Mirza Withdrew From Us Open यूएस ओपनमधून सानिया मिर्झाची माघार, निवृत्तीचा प्लॅन देखील बदलणार

ABOUT THE AUTHOR

...view details