नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Javelin Thrower Neeraj Chopra ) सातत्याने नवनवे विक्रम करत आहे. डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी करताना त्याने रौप्यपदकावर कब्जा केला ( Neeraj Chopra won the silver medal ) आहे. स्वीडनमध्ये सुरू असलेल्या डायमंड लीगच्या स्टॉकहोम हंगामात त्याने 89.94 मीटरच्या विक्रमी भाला फेकत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे.
यासह त्याने गेल्या 15 दिवसांत दुसऱ्यांदा स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला ( Neeraj broke his own national record ) आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वी नीरजने फिनलंडमध्ये झालेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटरपेक्षा जास्त लांब भाला फेकून करून राष्ट्रीय विक्रम केला होता.
डायमंड लीगमध्ये नीरजची कामगिरी -
पहिला प्रयत्न - 89.94 मीटर
दुसरा प्रयत्न - 84.37 मीटर