महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 18, 2023, 10:51 PM IST

ETV Bharat / bharat

Plant Procession : वड बनला वर तर कडुलिंब बनली वधू!, निघाली वृक्षांची अनोखी वरात!

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये वृक्षारोपणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वृक्षांची वरात काढण्यात आली होती. वरातीत वधू म्हणून कडुनिंबाचे रोप ठेवण्यात आले होते. तर वडाचे रोपटे वर होते.

procession of plants in Meerut
मेरठमध्ये रोपांची वरात

पहा व्हिडिओ

मेरठ (उत्तर प्रदेश) :उत्तर प्रदेशच्यावनविभागाकडून मंगळवारी वृक्षांची एक अनोखी वरात काढण्यात आली. या वरातीत कडुनिंबाच्या रोपाला वधूप्रमाणे सजवण्यात आले होते. तर वडाचे रोपटे वर बनले होते. विशेष म्हणजे, या वरातीत झाडांशिवाय या भागातील खासदार आणि आमदारही सहभागी झाले होते. तसेच शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. या वरातीच्या माध्यमातून वृक्षारोपणासाठी जनजागृती करण्यात आली.

जनजागृतीसाठी काढली वृक्षांची वरात : मेरठमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी वनविभागाकडून मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येत आहे. वृक्षारोपणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही वृक्षांची वरात काढण्यात आली होती. या वरातीत वनविभागाच्या वतीने विविध प्रकारची झाडे एका वाहनावर ठेवण्यात आली होती. तर विविध शाळेतील विद्यार्थ्यी वराती म्हणून त्यांच्या मागून येते होते.

आमदार आणि खासदारही झाले सहभागी : वरातीत वधू म्हणून कडुनिंबाचे रोप ठेवण्यात आले होते. तर वर म्हणून वडाचे रोपटे होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार लक्ष्मीकांत बाजपेयी स्वत: वराती म्हणून उपस्थित होते. तर हापूर मेरठ लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र अग्रवाल आणि गाझियाबाद मेरठ विभागातील आमदार धर्मेंद्र भारद्वाज हेही यात सहभागी झाले होते.

लोकांमध्ये जागृती होईल :यावेळी बोलताना खासदार लक्ष्मीकांत बाजपेयी म्हणाले की, ज्याप्रकारे हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, त्यामुळे नक्कीच लोकांमध्ये जागृती निर्माण होईल. आमदार धर्मेंद्र भारद्वाज म्हणाले की, आम्ही सर्वजण जास्तीत जास्त रोपे लावण्याचा संकल्प घेऊन या उपक्रमात सहभागी झालो आहेत. भाजपचे खासदार राजेंद्र अग्रवाल म्हणाले की, केवळ वृक्षारोपण करून थांबायला नको, त्या रोपांपासून झाडे बनण्याची जबाबदारीही आपली असली पाहिजे. डीएफओ राजेश कुमार म्हणाले की, या प्रयोगामागील मूळ उद्देश हा आहे की आपण सर्व वृक्षांशी भावनिक नाते जोडले पाहिजे. सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

  1. Police Returned Beggars Money : पैसे पावसात भिजल्याने भिकारी ढसा-ढसा रडला, पोलीस आले आणि..

ABOUT THE AUTHOR

...view details