डेहराडून - देशामधील कोरोनाची परिस्थिती भयानक बनत चालली आहे. कोरोनाची नवीन रुग्णे विक्रमी पातळीवर नोंदविली जात आहेत. उत्तराखंडमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढतच चालली आहे. रुग्णालयात भरती झाल्यानंतर 48 तासांच्या आत जवळपास 50 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना डेथ ऑडिट कमेटीचे अध्यक्ष हेमचंद्र यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतरही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, हे मृत्यमागे कारण आहे. प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात रुग्ण दाखल होत आहेत. यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार होत नाहीत. रुग्णालयात उशीराने दाखल होणे, हे मृत्यूमागे मुख्य कारण असल्याचे हेमचंद्र यांनी सांगितले.