नवी दिल्ली - बांधकाम सुरू असलेली सत्य निकेतन ही इमारत आज दुपारी ( Satya Niketan collapsed in Delhi ) कोसळली आहे. बांधकामाच्या कोसळलेल्या ढिगाऱ्यातून एनडीआरएफच्या जवानांनी एकाची सुटका केली ( NDRF personnel rescued one person ) आहे.
राजधानी दिल्लीतील मोती बाग परिसरातील सत्य निकेतनमध्ये सोमवारी दुपारी तीन मजली इमारत कोसळली. सत्य निकेतनमधील १७३ क्रमांकाच्या इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू होते. इमारत कोसळल्यांतर ढिगाऱ्याखाली तेथे काम करणारे पाच मजूर गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी तीन जेसीबीसह एनडीआरएफची टीम आणि आपत्कानीन गटाचे कर्मचारी बचावकार्य करत आहेत.
घटनास्थळी बचावकार्य सुरू-सत्य निकेतन इमारत कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी 1.25 च्या सुमारास घडली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत कोसळताना मोठा आवाज झाला. इमारत कोसळताच एकच गोंधळ उडाला. परिसरातील लोकांनी दुर्घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे चार पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे
नुतनीकरण करताना इमारत कोसळली- अग्निशमन विभागाने सांगितले की, तीन मजली इमारत कोसळली आहे. त्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. बचावकार्यासाठी पथके घटनास्थळी हजर आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली अग्निशमन सेवेला सकाळी 1.30 च्या सुमारास या घटनेची माहिती देण्यात आली.