नवी दिल्ली - महिलावंरील बलात्काराच्या घटनांबाबत धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे अहवाल ब्युरोमधून (एनसीआरबी) समोर आली आहे. 2020 मध्ये रोज सरासरी 77 बलात्काराच्या घटना घडल्या आहे. या वर्षात 28,046 बलात्काराच्या घटना घडल्याचे एनसीआरबीच्या आकडेवारीमधून समोर आले आहे.
गतवर्षी महिलांविरोधातील अन्यायाचे एकूण 3,71,503 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर 2019 मध्ये महिलांशी संबंधित 4,05,326 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर 2018 मध्ये महिलांशी संबंधित 3,78,236 गुन्हे नोंदविण्यात आल्याचे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा-दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून आणखी तीन दहशतवाद्यांना युपीमधून अटक
कोरोना महामारीतही बलात्काराच्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त
2020 मध्ये कोरोना महामारी आणि देशात टाळेबंदी सुरू होती. या काळात महिलांवरी 28,046 बलात्काराची प्रकरणे घडली आहेत. यामधील 25,498 हे पीडित हे प्रौढ तर 2,655 पीडित हे 18 वर्षांहून कमी होते. भारतीय दंडविधान कायदा कलम 376 नुसार बलात्काराच्या प्रकरणाची गुन्हा म्हणून नोंद होते. 2019 मध्ये 376 कलमानुसार 32,033 तर 2018 मध्ये 33,356 तर 2017 मध्ये 32,559 बलात्कार प्रकरणांची पोलिसांत नोंद झाली आहे.
हेही वाचा-बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबई येथील कार्यालयाचे आयकर विभागाकडून सर्वेक्षण