नवी दिल्ली -बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगाने ट्विटरविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. चुकीची माहिती पुरवणे आणि पॉक्सो कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ही तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म टि्वटवर एफआयआर नोंदविला.
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म टि्वटर सुरक्षित नसल्यामुळे मुलांना ते वापरण्याची अनुमती देऊ नये, असे आम्ही केंद्राला लेखी पाठवल्याचे एनसीपीसीआरचे अध्यक्ष प्रियांक कानुंगू यांनी सांगितले. ट्विटरनं पॉक्सो कायद्याच्या नियम 11,15,19 चं उल्लंघन केलं आहे. तसेच आयपीसी कलम 199 चेही उल्लघंन केले आहे.