महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NCP Leader PP Faizal : शरद पवार गटाला मोठा दिलासा; लोकसभा अध्यक्षांच्या 'त्या' निर्णयानं वाढली खासदारांची संख्या - अजित पवार गट

NCP Leader PP Faizal : लोकसभा सचिवालयानं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेता मोहम्मद फैजल पीपी यांची पात्रता रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला. याचा अर्थ त्यांचं संसदेचं सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आलंय.

खासदार मोहम्मद फैजल
खासदार मोहम्मद फैजल

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 6:56 AM IST

Updated : Nov 3, 2023, 12:42 PM IST

नवी दिल्ली NCP Leader PP Faizal :राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर लोकसभा सचिवालयानं गुरुवारी फैजल यांचं सदस्यत्व बहाल केलंय. मोहम्मद फैजल हे लक्षद्वीपचे खासदार आहेत. अलीकडेच सुप्रीम कोर्टानं खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.

अपात्रतेचा निर्णय रद्द : लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंग यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, फैजल यांच्या अपात्रतेचा निर्णय रद्द करण्यात आलाय. परंतु, हा निर्णय पुढील न्यायिक निर्णयांच्या अधीन असणार आहे. या वर्षी ४ ऑक्टोबर रोजी त्यांना लोकसभेचं सदस्य म्हणून दुसऱ्यांदा अपात्र ठरवण्यात आलं होतं.

काय होता आरोप : खासदार मोहम्मद फैजल आणि अन्य तिघांना पी. सालेह यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 10 वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा कोर्टानं सुनावलीय. कवरत्ती सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली होती. त्यानंतर फैजल यांनी या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयानंही त्यांची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार या प्रकरणावर पुन्हा सुनावणी झाली असता कोर्टानं फैजल यांना दोषी ठरवलंय.

  • दोन वेळा खासदार : मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. ते 2014 आणि 2019 मध्ये लक्षद्वीपमधून खासदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेसचे सदस्य राहुल गांधी यांनीही त्यांचं सदस्यत्व गमावलं होतं. परंतु, सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयावर स्थगिती आणण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांना लोकसभेचं सदस्यत्व बहाल करण्यात आलं होतं.

शरद पवार गटाला दिलासा : निवडणूक आयोगात सध्या पक्ष आणि चिन्ह कुणाचं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात लढा सुरू आहे. लोकसभेत सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे खासदार आहेत. तर मोहम्मद फैजल यांची खासदारकी परत मिळाल्यानंतर लोकसभेत शरद पवार गटाच्या खासदारांची संख्या वाढली आहे.

हेही वाचा :

  1. NCP Political Crisis : खरी राष्ट्रवादी कुणाची? 'हे' तीन आमदार सोडून शरद पवार गटाच्या आमदारांना विधीमंडळाच्या नोटीस
  2. SC Issues Notice to MH Speaker : शरद पवार गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस
  3. NCP Political Crisis : राष्ट्रवादीचं घड्याळ कुणाचं? काका-पुतण्याचं भवितव्य ठरणाऱ्या आज 'या' दोन आहेत महत्त्वाच्या सुनावणी
Last Updated : Nov 3, 2023, 12:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details