नवी दिल्ली : माजी गव्हर्नर मार्गारेट अल्वा विरोधी पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार ( Oppositions VP Candidate Margaret Alva ) असतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज दिल्लीत केली.
आम्ही ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या वेळी त्यांनी आमच्या संयुक्त राष्ट्रपती उमेदवाराला पाठिंबा दिला होता असेही पवार म्हणाले.