गडचिरोली: या आठवड्यात जिल्ह्यातील ही दुसरी घटना असल्याची माहिती पोलीसांनी दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, सशस्त्र नक्षलवाद्यांनी पुरस्लागोंडी-अलेंगा रस्त्यावरील पुलाच्या बांधकामात गुंतलेले एक जेसीबी मशीन, एक पोकलेन मशीन आणि एक मिक्सर मशीन जाळले. या घटनेची चौकशी सुरू आहे.
वाहनांना लावलीआग: याआधीही असाच हल्ला झाला होता. छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामात गुंतलेल्या 3 वाहनांना आग लावली होती. यासोबतच काम करत असलेल्या कामगारांना नक्षलवाद्यांनी इशारा दिला होता. यानंतर संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण आहे. ही घटना जिल्हा मुख्यालयातील कुकडझोर भागातील घडली होती. कुकडझोर येथील रेंगबाडा परिसरात प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम सुरू होते. या भागात रस्ते बांधणीला नक्षलवादी सातत्याने विरोध करत होते. त्यानंतर आज नक्षलवाद्यांनी येथे उपस्थित असलेल्या वाहनांना आग लावली होती. १५ ते २० नक्षलवादी आले होते. रेंगबेडा गावात १५ ते २० नक्षलवादी पोहोचल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पाण्याचा टँकर, १ विब्रो मशीन, १ मोटारसायकल पेटवून दिली होती. यावेळी नक्षलवाद्यांनी वाहनांची देखभाल आणि तेथे काम करणाऱ्या मजुरांना काम बंद ठेवण्याचा इशाराही दिला.