कांकेर/विजापूर Naxalite Killed Villagers:छत्तीसगड विधानसभा 2023 च्या पहिल्या टप्प्यासाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त बस्तर विभागातील 12 विधानसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे. निवडणुकीपूर्वी दहशत पसरवण्यासाठी नक्षलवादी सातत्यानं हिंसाचार करत आहेत. सोमवारी रात्री कांकेर नारायणपूर सीमावर्ती भाग, तसंच महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या जंक्शनजवळ माओवाद्यांनी 3 जणांची हत्या केली. विजापूरमध्येही एका गावकऱ्याची हत्या करण्यात आली आहे.
कांकेरमध्ये तीन ग्रामस्थांची हत्या : कांकेरमध्ये हत्या करण्यात आलेलं सर्व गावकरी मोरखंडी गावातील रहिवासी आहेत. मोरखंडी हे गाव कांकेरपासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. हत्या करण्यात आलेल्यामध्ये कुल्ले कतलामी (35 वर्ष ), मनोज कोवाची (22 वर्ष), दुग्गे कोवाची ( 27 वर्ष) यांचा समावेश आहे. अद्यापपर्यंत पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. गावकऱ्यांनी मृतदेह घेऊन छोटे बेटिया पोलीस ठाणं गाठलं आहे. याबाबत कांकेरचे पोलीस अधीक्षक दिव्यांग पटेल यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं म्हटलंय.
विजापूरमध्ये गावकऱ्याचीही हत्या : विजापूरच्या गलगाम गावातील मुचकी लिंगा नावाच्या व्यक्तीचीही दोरीनं गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर मृतदेह नादापल्ली, गलगाम गावांदरम्यान रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला आहे. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या आरोपावरून नक्षलवाद्यांनी गावकऱ्याची हत्या केली आहे. सध्या आसपासच्या भागात सखोल शोधमोहीम सुरू आहे.
नरेंद्र मोदी आज छत्तीसगडमध्ये :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडमध्ये येणार आहेत. कांकेर जिल्ह्यात पंतप्रधान मोदी निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत. कांकेर, अंतागड आणि भानुप्रतापपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यात १७ नोव्हेंबरला मतदान होणार असून मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे.
हेही वाचा -
- Two Murders In Nagpur : नागपुरात दोघांची हत्या, प्रॉपर्टी डीलरच्या डोक्यात झाडली गोळी
- Youth Killed By Tractor : जमिनीच्या वादातून ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या, मरेपर्यंत सहा वेळा अंगावरून ट्रॅक्टर चालवला
- Thane Crime News : दारूला पैसे न दिल्याने एकाची हत्या, आरोपी अटकेत