रांची/चाईबासा - माजी आमदार गुरुचरण नायक यांच्या नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात माजी आमदारांच्या दोन अंगरक्षकांचा मृत्यू झाला आहे. गुरुचरण गोयलकेरा येथील टुनिया गावात फुटबॉल स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. या हल्ल्यातून ते सुखरुप बचावले आहेत. नक्षलींच्या हल्ल्यात माजी आमदारांच्या दोन अंगरक्षकांचा मृत्यू झाला असून एक सुरक्षित आहे. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी माजी आमदार गुरुचरण नायक यांच्या बॉडीगार्डची शस्त्रेही लूटून नेली आहेत.
Naxalites attack : माजी आमदार गुरुचरण नायक यांच्यावर नक्षली हल्ला.. दोन अंगरक्षकांची हत्या
माजी आमदार गुरुचरण नायक यांच्या नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात माजी आमदारांच्या दोन अंगरक्षकांचा मृत्यू झाला आहे. गुरुचरण गोयलकेरा येथील टुनिया गावात फुटबॉल स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. या हल्ल्यातून ते सुखरुप बचावले आहेत.
पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील मनोहरपूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार व भाजप नेते गुरुचरण नायक यांच्या नक्षलवाद्यांनी हल्ला केला.नक्षलवाद्यांनी दोन अंगरक्षकांची हत्या करून त्यांच्याकडील AK47 रायफल्स व काडतुस घेऊन पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार शंकर नायक आणि ठाकुर हेम्ब्रम अशी मृत्यू झालेल्या दोन अंगरक्षकांची नावे आहेत. चाईबासा जिल्ह्यातील गोइलकेरा ठाणे परिसरातील झिलरूवा गावात क्रीडा स्पर्धेतील पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी माजी आमदार गुरुचरण नायक सायंकाळी सहा वाजता आले होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. फायरिंग सुरु असताना माजी आमदार लपून बसले व आपला जीव वाचवला. घटनास्थळावर पोलीस पोहोचले आहेत.