महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Navy Fired on Fisherman: नौदलाच्या गोळीबारात एक मच्छिमार जखमी, तामिळनाडूच्या मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता - तामिळनाडूच्या मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

Navy Fired on Fisherman: नौदलाने केलेल्या गोळीबारात एक भारतीय मच्छिमार जखमी झाला आहे. त्याचे नाव के वीरवेल असून, तो 32 वर्षांचा आहे. तो इतर नऊ साथीदारांसह मासेमारीसाठी आला असताना ही घटना घडली. कोडियाकराई सागरी परिसरात त्यांनी एक बोट आणली होती. NAVY MISTAKENLY FIRED ON FISHERMEN

Navy Fired on Fisherman
नौदलाच्या गोळीबारात एक मच्छिमार जखमी, तामिळनाडूच्या मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

By

Published : Oct 21, 2022, 5:29 PM IST

चेन्नई (तामिळनाडू): Navy Fired on Fisherman: नौदलाने केलेल्या गोळीबारात एक भारतीय मच्छिमार जखमी झाला आहे. त्याचे नाव के वीरवेल असून, तो 32 वर्षांचा आहे. तो इतर नऊ साथीदारांसह मासेमारीसाठी आला असताना ही घटना घडली. कोडियाकराई सागरी परिसरात त्यांनी एक बोट आणली होती. NAVY MISTAKENLY FIRED ON FISHERMEN

तामिळनाडूच्या मत्स्यव्यवसाय मंत्री अनिता राधाकृष्णन यांनी स्वत: जखमी झालेल्या मच्छिमाराची भेट घेतली. त्यांच्यावर मदुराई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सीटी स्कॅनमध्ये मच्छिमाराच्या अंगावर चार गोळ्या लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

ते म्हणाले की, सध्या कारवाई सुरू आहे. मंत्र्यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या अहवालानुसार मच्छिमाराच्या पोटात आणि मांडीला गोळ्या लागल्या आहेत. नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वारंवार इशारा देऊनही मच्छिमार थांबले नाहीत, त्यामुळे त्यांना गोळीबार करावा लागला.

ABOUT THE AUTHOR

...view details