विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत नौदल दिन उत्साहात साजरा झाला. (Navy Day Celebration In Visakhapatnam). येथील रामकृष्ण बीचवर आयोजित कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपती आणि सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) प्रमुख पाहुण्या होत्या. आयएनएस सिंधुकीर्ती आणि जगाला प्रदक्षिणा घालणाऱ्या आयएनएस तरंगिणी या पाणबुडीवरील खलाशांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. नवी दिल्लीबाहेर नौदल दिन साजरा करण्याची ही पहिलीच वेळ होती. राष्ट्रपतींसह नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार, केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Navy Day Celebration : राष्ट्रपतींच्या उपस्थितीत नौदल दिन उत्साहात साजरा - Shankar–Ehsaan–Loy in Navy Day Celebration
शंकर-एहसान-लॉय या सुप्रसिद्ध संगीतकार त्रिकुटाने संगीतबद्ध केलेले आणि प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या भारतीय नौदलावरील विशेष गाण्याचे देखील यावेळी प्रकाशन करण्यात आले. (Shankar–Ehsaan–Loy in Navy Day Celebration). या गाण्याला भारतीय नौदलाच्या बँडने साथ दिली. (Navy Day Celebration In Visakhapatnam).
![Navy Day Celebration : राष्ट्रपतींच्या उपस्थितीत नौदल दिन उत्साहात साजरा Etv Bharat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17112666-thumbnail-3x2-navy.jpg)
नौदलाचे विविध प्रात्यक्षिक : नौदलाच्या कमांडोंनी सीकिंग हेलिकॉप्टरमधून स्लिदरिंग ऑपरेशन केले. त्यानंतर मार्कोस (मरीन कमांडोज) च्या लढाऊ कौशल्याचे प्रात्यक्षिक केले. हॉक विमाने तसेच मिग 29 के विमान देखील शोमध्ये होते. नौदलाच्या युद्धनौका मिसाईल कॉर्व्हेट आयएनएस खंजर, आयएनएस कदम आणि आयएनएस किर्च, डिस्ट्रॉयर आयएनएस दिल्ली, फ्रिगेट आयएनएस सह्याद्री आणि डिस्ट्रॉयर आयएनएस कोची या प्रदर्शनात होत्या. नौदल हेलिकॉप्टर चेतक आणि अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर ALH Mach-3 मधून कमांडोजने मिशन दरम्यान शोध आणि बचाव कार्याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर चार हेलिकॉप्टरने समुद्रकिनारी असलेल्या युद्धनौकांवर अचूक लँडिंगचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
नौदलावरील विशेष गाण्याचे प्रकाशन : युद्धनौकांवरून रॉकेट डागणे हे या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण होते. स्कायडायव्हर अनुप सिंग यांनी विमानातून फ्रीफॉल केल्यानंतर राष्ट्रपतींना ‘भारतीय नौदलाचा इतिहास’ हे पुस्तक भेट दिले. शंकर-एहसान-लॉय या सुप्रसिद्ध संगीतकार त्रिकुटाने संगीतबद्ध केलेले आणि प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या भारतीय नौदलावरील विशेष गाण्याचे देखील यावेळी प्रकाशन करण्यात आले. गाण्याला भारतीय नौदलाच्या बँडने साथ दिली. यावेळी राष्ट्रपतींनी व्हर्च्युअल मोडमध्ये कुर्नूल जिल्ह्यातील नॅशनल ओपन एअर रेंज आणि कृष्णा जिल्ह्यातील निम्माकुरू येथे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या प्रगत नाईट व्हिजन उत्पादन कारखान्याचे देखील उद्घाटन केले.