नवरात्रोत्सव ( Navratri Festival ) देशभरात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. काही लोक नवरात्रामध्ये नऊ दिवस उपवास करतात. उपवास करताना खिचडी, वरईचा भात हे पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर साबुदाण्यापासून ( Sabudana Recipes ) तयार करण्यात आलेले हे टेस्टी पदार्थ तुम्ही ट्राय करु शकता. ( Navratri Recipe 2022 Know Sabudana Recipes In Marathi )
साबुदाण्याचा डोसा - प्रथम साबुदाणा धुवा. त्यानंतर साबुदाणा 4 तास भिजत घालावा तर भगर अर्धा तास भिजवून घ्यावी. मिक्सरमध्ये साबुदाणा, भगर, दही आणि थोडं पाणी घालून मिश्रण बारीक वाटावे. या मिश्रणामध्ये मीठ घाला. हे मिश्रण तव्यावर टाकून याचा डोसा तयार करा.
साबुदाण्याचे थालिपीठ -ज्याप्रमाणे आपण साबुदाणा वड्यासाठी मिश्रण तयार करतो त्याच प्रमाणे साबुदाणा थालिपीठसाठी मिश्रण तयार करा. या मिश्रणाचे थालिपीठ तयार करा. हे थालिपीठ तव्यावर भाजून घ्या. साबुदाण्याचे थालिपीठ हे टेस्टी लागते तसेच हे तयार करताना तेलाचा वापर देखील जास्त केला जात नाही. त्यामुळे हे थालिपीठ हेल्दी आहे.