हैदराबाद :नवरात्रोत्सवात दुर्गेचं सातवं सिद्ध रूप असलेल्या देवी कालरात्रीची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी, दुर्गा देवीच्या सर्वात शक्तिशाली रूपाची विधीपूर्वक पूजा केली जाते. असं मानलं जातं की या दिवशी देवी कालरात्रिची पूजा केल्यानं आणि मंत्रोच्चार केल्यानं सर्व प्रकारचं दुःख आणि वेदना दूर होतात. माता कालरात्रीला सर्व सिद्धीची देवी म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी मातेची पूजा तंत्र-मंत्रानेही केली जाते. देवी कालरात्रीच्या मंत्रांचा योग्य रीतीनं जप केल्यानं वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते. नकारात्मक शक्ती घरातून पळून जातात असाही शास्त्रांमध्ये उल्लेख आहे.
- आई कालरात्रीचे रूप : कालरात्री मातेला तीन डोळे आणि चार हात असल्याचं शास्त्रात सांगितलं आहे. आईच्या प्रत्येक हातात वरद मुद्रा, अभयमुद्रा, लोखंडी धातूचा काटा आणि तलवार आहे. देवी माता गाढवावर स्वार होऊन आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकण्यासाठी येते.
देवी कालरात्री पूजन पद्धत : नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी स्नान करावे, ब्रह्म मुहूर्तावर ध्यान करावे आणि पूजास्थानाची पूर्ण स्वच्छता करावी. यानंतर पूजास्थानाला गंगाजलाने स्वच्छ करावे, त्यानंतर आईला फुले, सिंदूर, कुमकुम, अक्षत इत्यादी अर्पण करा. देवी कालरात्रीला लिंबाचा हार अर्पण करा आणि गुळाचा पदार्थ अर्पण करा. यानंतर तुपाचा दिवा लावून मंत्रांचा जप करावा. त्यानंतर देवी कालरात्रिची आरती करावी. आरतीपूर्वी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशती पाठ करायला विसरू नका. आरतीनंतर, आपल्या नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागण्यासाठी देवीकडे प्रार्थना करा.
- नवरात्रीचा सातवा दिवस - (राखाडी) : 21 ऑक्टोबर रोजी देवी कालरात्रीच्या पूजेसाठी राखाडी रंग परिधान करा. राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे. व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो. हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे, ज्यांना फिकट रंग पसंत आहे. तर नवरात्रीमध्ये राखाडी रंगाची पूजा केल्यानं दुष्टांचा नाश होतो.
हेही वाचा :
- Navratri 2023 Day 4 : शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केली जाते कुष्मांडा देवीची पूजा; जाणून घ्या पूजा पद्धत आणि रंग
- Navratri 2023 Day 5 : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी करा स्कंदमातेची पूजा; जाणून घ्या पूजेची पद्धत आणि रंग...
- Navratri 2023 Day 6 : कात्यायनी देवीची पूजा केल्यानं सर्व दु:ख होतात दूर; जाणून घ्या पूजा पद्धत आणि रंग