महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Navratri 2022: नवरात्रीला करा असा मेकअप ज्यामुळे चेहऱ्यावर येईल ग्लो; जाणून घ्या मेकअप टिप्स मराठीत - Makeup

नवरात्रीत ( Navratri 2022 ) तरुणाईसाठी खास आकर्षण असते ते दांडिया, गरबाचे. कोरोनाच्या सावटानंतर तब्बल २ वर्षांनी गरबासाठी तरुणाई थिरकणार आहे. अनेक ठिकाणी दांडिया नाइट्स तर काही ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी हटके लूक करण्याची प्रत्येकाची धडपड सुरू असते. मग ड्रेस सिलेक्शन, डान्स प्रॅक्टिस, मेक अप यांसारख्या गोष्टी करण्यात येतात. पण तुम्हाला खरेच तुमचा लूक हटके करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मेकअपकडे ( Makeup) लक्ष देणे गरजेचे आहे. ( Makeup At Home Step By Step At Home In Marathi )

Makeup
नवरात्रीला करा असा मेकअप

By

Published : Sep 22, 2022, 10:18 AM IST

मुंबई : सध्या नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी संपूर्ण देशभरामध्ये सुरु आहे. या नवरात्रीत ( Navratri 2022 ) तरुणाईसाठी खास आकर्षण असते ते दांडिया, गरबाचे. कोरोनाच्या सावटानंतर तब्बल २ वर्षांनी गरबासाठी तरुणाई थिरकणार आहे. अनेक ठिकाणी दांडिया नाइट्स तर काही ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी हटके लूक करण्याची प्रत्येकाची धडपड सुरू असते. मग ड्रेस सिलेक्शन, डान्स प्रॅक्टिस, मेक अप यांसारख्या गोष्टी करण्यात येतात. पण तुम्हाला खरेच तुमचा लूक हटके करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मेकअपकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला मेकअप ( Makeup ) ( Makeup At Home Step By Step At Home In Marathi )

मेकअप टिप्स (Makeup tips ) -

  • क्लीन्जर - मेकअप करण्याची पहिली पायरी म्हणजे सर्वात आधी चांगल्या क्लीन्जरने चेहरा स्वच्छ करावा. क्लीन्जिंग करण्यासाठी नैसर्गिक अशा कच्च्या दुधाचाही वापर करता येतो.
  • टोनर - चेहरा क्लीन्जिंग झाल्यावर त्वचेचा पीएच स्तर नियंत्रित ठेवण्यासाठी टोनर गरजेचा असतो. टोनर म्हणून कोरफड जेलचा उपयोगही करता येतो. कोरफड जेल स्प्रे बॉटलमधे भरुन तो टोनर म्हणून वापरता येतो.
  • सीरम -जर त्वचा कोरडी असेल तर सीरम वापरावे. सीरममुळे त्वचा मेकअपसाठी तयार होते. तसेच त्वचा चमकायला लागते. हिवाळ्यात त्वचेला ओलाव्याची जास्त गरज असते. त्यामुळे हिवाळ्यात मेकअप करताना कोरडी त्वचा असलेल्यांसाठीच सीरम महत्त्वाचे नसते तर सर्व प्रकारच्या त्वचेसाठी मेकअप करताना सीरम गरजेचे असते.
  • मॉश्चरायझर - मॉश्चरायझर लावणे ही त्वचेची नियमित काळजी घेण्यासाठी आवश्यक बाब आहे. मेकअप करताना चेहर्‍याला मॉश्चरायझर लावावे. आपल्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे मॉश्चरायझर निवडावे. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सौम्य स्वरुपाचे मॉश्चरायझर चालते.
  • प्रायमर -चेहर्‍यावर मेकअप नीट बसण्यासाठी आधी त्वचेला प्रायमर लावणे गरजेचे आहे. प्रायमर हे देखील आपल्या त्वचच्या स्वरुपानुसार उपलब्ध असतात. जर त्वचा कोरडी असेल तर ऑइल बेस्ड प्रायमर वापरायला हवा.
  • फाउंडेशन - प्रायमर लावल्यानंतर फाउंडेशन लावावं. फाउंडेशन हे ठिपक्या ठिपक्यांनी लावायचं असतं. एकदम जास्त फाउंडेशन लावाल तर मेकअप फसणार हे नक्की. फाउंडेशन निवडताना आपल्या स्किन टोनपेक्षा एक टोन लाइट शेट घ्यावी. डार्क फाउंडेशन लावल्यास मेकअप बिघडतो.
  • कंसीलर -चेहर्‍यावरील काळे डाग, खराब भाग झाकण्यासाठी कंसीलर वापरायचं असते. डोळ्याखाली काळी वर्तुळं असल्यास तिथेही कंसीलर वापरावे लागते. फक्त त्यासाठी आधी अंडर आय क्रीम लावावं आणि मग कंसीलर लावावे.
  • पावडर - कंसीलर लावून झाले की चेहर्‍याला थोडी पावडर लावावी लागतेच. त्यासाठी प्लेन किंव टिंटेड पावडर वापरु शकता. मेकअप करताना पावडर लावल्यानं चेहरा पांढरा फट पडत नाही. उलट पावडरमुळे त्वचेतील जास्तीचं तेल शोषून घेतलं जातं आणि मेकअप टिकून राहात्.
  • ब्रॉन्जर - चेहर्‍याला फाउंडेशन लावलं की संपूर्ण चेहरा एक समान दिसतो. चेहर्‍याचा शेप दिसणं गरजेचे आहे. यासाठी पावडर लावल्यानंतर चेहर्‍याला ब्रॉन्जर लावावं.
  • आय मेकअप - या क्रमाने मेकअप झाल्यावर डोळ्यांचा मेकअप करावा. डोळ्यांचा मेकअप करताना आयशॅडो, मग आयलायनर आणि शेवटी मस्कारा लावावा.
  • लिपस्टिक- मेकअपचा शेवट हा लिपस्टिकने होतो. आपल्याला जी सूट होईल ती लिपस्टिक लावावी. लिपस्टिक लावण्याआधी लिप बाम लावावा. त्यावर लिपस्टिक लावावी.

ABOUT THE AUTHOR

...view details