नेल्लोर (आंध्रप्रदेश) - आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील श्री वसवी कन्याकपरामेश्वरी मंदिरात दरवर्षी दसरा नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. मंदिराला कमिटी सदस्यांनी 5.16 कोटी रुपयांच्या चलनी नोटांनी सजवले होते. 2000, 500, 200, 100, 50, 20, 10 रुपयांच्या नव्या चलनी नोटांसह 7 किलो सोने आणि 60 किलो चांदीने कन्याकापरमेश्वरी मंदिर सजवण्यात आले आहे.
मंदिर 5 कोटीच्या चलनी नोटांनी सजलेले -
नेल्लोर शहरातील स्टोन हाऊस पेटा येथे वसवी कन्याकपरामेश्वरी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्णपणे 5 कोटीच्या चलनी नोटांनी सजलेले आहे. शंभरहून अधिक स्वयंसेवकांनी नोटांच्या गठ्ठ्यांनी मंदिर सजवले आहे. कन्याकपरामेश्वरीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष, NUDAचे अध्यक्ष मुक्कला द्वारकानाथ आणि प्रशासकीय समितीच्या सदस्यांनी नवरात्रोत्सवास विशेष प्रार्थना केली.
भक्तांनी व्यक्त केल्या भावना -
मंदिर कमिटीने खूप चांगले विकसित केले गेले आहे. जसे आपण आपल्या लहानपणापासून ते पाहत आहोत. अतिशय चपखलपणे नवीन चलनी नोटांनी मंदिर सुशोभित केले होते. मंदिर समिती सदस्यांनी संपूर्ण मंदिर 5 कोटी रुपयांनी सजवले. मंदिराचे जीर्णोद्धारही आकर्षक पद्धतीने करण्यात आले आहे. भक्तांसाठी बनवलेल्या सर्व सुविधा पाहून आम्ही समाधानी आहेत असे येथे आलेल्या भक्तांनी सांगितले.