चंदीगड-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग हे दिल्ली यांची मुख्यमंत्री पदावरून विकेट काढल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांचे पंजाबच्या राजकारणात पारडे जड झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, अचानक नवज्योत सिंग यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यावरून अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग यांना टोला लगावला आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की राजीनामा दिला असला तरी काँग्रेससाठी काम सुरुच ठेवणार आहे. नवज्योत सिंह यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले, की मी पक्षात राहून तडजोड करत असल्याचे मला वाटत आहे. अजेंड्याच्या मदतीने पंजाबचे भविष्य पाहत आहे. त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ट्विट करत नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की तुम्हाला मी सांगितले होते, की तो अस्थिर माणूस आहे. ते सीमेवर असलेल्या पंजाब राज्यासाठी योग्य नाही.
संबंधित बातमी वाचा-पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग म्हणाले,...
यापूर्वी अमरिंदर सिंग यांनी ही केली होती सिद्धू यांच्यावर टीका
राजीनामा दिल्यानंतरही अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर केली होती टीका-
कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले होते, की नवज्योत सिंग सिद्धू हा अकार्यक्षम माणूस आहे. ते मोठे संकट होणार आहेत. पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाला विरोध असणार आहे. त्यांचे पाकिस्तानबरोबर संबंध आहेत. नवज्योत सिंग हे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका असणार आहेत. सिद्धू हे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान व पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांचे मित्र आहेत. मी माझ्या देशासाठी पंजाबचे मुख्यमंत्री पदाकरिता नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावाला विरोध करणार आहेत. हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे.