नवी दिल्ली :काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू (Congress leader Navjot Singh Sidhu) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांना बडा भाई म्हणाल्याने नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा व्हिडिओ भाजपाच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय (BJP Leader Amit Malviya) यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यावर आता नवज्योत सिंद्धू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, 'भाजपाला जे हवे ते बोलू द्या, त्यांना जे आरोप करायचे ते करू द्या, त्यातून मला काही फरक पडणार नाही'.
नवज्योत सिंह सिद्धूंचे पाकिस्तानात स्वागत केले जात असताना सिद्धू तेथील अधिकाऱ्यांना इम्रान खान हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असल्याचे म्हणताना दिसतात. हा व्हिडिओ मालवीय यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू आज (शनिवार) करतापूर कॉरिडोर येथून पाकिस्तान येथील करतारपूर गेले आहेत. पाकिस्तानच्या करतारपूर पोहोचल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू यांचे पुष्पवर्षा करून स्वागत करण्यात आले. स्वागत स्विकारताना नवज्योत सिंह सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान यांना आपला मोठा भाऊ असे संबोधित केले. आणि त्यांना आपले प्रेम सांगितले.
याबाबतचा एक व्हिडिओ हा भाजपाच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांनी शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात की, राहुल गांधींचे आवडते नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना “बडा भाई” म्हणतात. मागच्या वेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांना मिठी मारली होती आणि कौतुकाचा वर्षाव केला होता. दिग्गज अमरिंदर सिंग यांच्यापेक्षा गांधी भावंडांनी पाकिस्तानवर प्रेम करणार्या सिद्धूची निवड केली यात काही आश्चर्य आहे का? असा सवाल त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे.
हेही वाचा -'लक्षात घ्या...अजुनही ही लढाई सुरुच'; राहुल गांधींचे शेतकऱ्यांना पत्र