नवी दिल्ली: पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू एक वर्षाची शिक्षा झालेली असताना, सिद्धू यांना त्यांच्या वागणुकीचा विचार करता त्यांना 10 महिन्यांत सोडण्यात आले आहे. त्यांची आज सुटका झाली असल्याने परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले आहे. दरम्यान, माध्यामांशी बोलताना सिद्धू म्हणाले, सध्या देशात लोकशाही नावाची गोष्ट नाही. आता पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट आणण्याचा कट सुरू आहे. तसेच, अल्पसंख्याकांनाही मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जात आहे असा थेट आरोप केला आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पंजाबला कमकुवत करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही कमकुवत व्हाल असही ते म्हणाले आहेत. तसेच, सिध्दू यांनी या देशात जेव्हा जेव्हा हुकूमशाही आली तेव्हा क्रांतीही आली आहे. आणि आता त्या क्रांतीचे नाव राहुल गांधी आहे असे म्हणत आपण काँग्रेसमध्ये आणि राहुल गांधींसोबत आहोत असे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
सोडण्यास उशीर केला : आज लोकशाही नावाची गोष्ट उरलेली नाही. पंजाबमध्ये अल्पसंख्याक आहेत त्यांना टार्गेट केले जात आहे. तसेच, पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट आणण्याच्या कटाचा एक भाग म्हणूनही त्यांना लक्ष्य केले जात आहे असही ते म्हणाले आहे. परंतु, तुम्ही पंजाबला कमकुवत करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही कमकुवत व्हाल असही ते म्हणाले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, तुरुंग प्रशासनाने मला दुपारी सोडण्यात येईल असे सांगितले होते. पण सोडण्यास उशीर केला अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.