महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Navalkishore Meena Arrested : 15 लाख रुपयांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक - चिटफंड प्रकरण

Navalkishore Meena Arrested : राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) 15 लाख रुपयांची लाच घेताना अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. ईओ नवलकिशोर मीणा असं या आधिकाऱ्याचं नाव आहे. मीणा यांनी चिटफंड प्रकरणात अटक टाळण्यासाठी तक्रारदाराकडं 17 लाख रुपयांची लाच मागितली होती.

Navalkishore Meena Arrested
Navalkishore Meena Arrested

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 6:44 PM IST

जयपूर Navalkishore Meena Arrested:राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यासह त्याच्या साथीदाराला 15 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. चिटफंड प्रकरणात अटक न करण्याच्या बदल्यात त्यानं तक्रारदाराकडं 17 लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराकडून अधिकाऱ्यासह त्याच्या साथीदाराला 15 लाखांची लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलंय.


15 लाखांची लाच घेताना अटक : एसीबीचे प्रभारी पोलीस महासंचालक हेमंत प्रियदर्शी यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारानं एसीबीच्या जयपूर नगर (III) युनिटकडं तक्रार दाखल केली होती. अंमलबजावणी संचालनालयाच्या, इंफाळ कार्यालयात (मणिपूर) त्याच्याविरुद्धचा खटला सुरू आहे. या खटल्यात मालमत्ता जप्ती, तसंच अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडं अधिकाऱ्यानं 17 लाखांची लाच मागितली होती. ईओ नवलकिशोर मीणा असं या आधिकाऱ्याचं नाव आहे. त्याला तक्रारदाराकडून 15 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. एसीबीचे उपअधीक्षक सुरेशकुमार स्वामी, सत्यवीर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकानं सापळा रचून ही कारवाई केलीय.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये इम्फाळमधील अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) नवलकिशोर मीणा, बाबुलाल मीणा, यांचा समावेश आहे. नवल किशोर मीणा यांनी एका प्रकरणात तक्रारदाराकडं 17 लाखांची लाच मागितली होती. त्यानंतर नवलकिशोर मीणा यांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. - हेमंत प्रियदर्शी, पोलीस महासंचालक

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत चौकशी :पोलीस महासंचालक हेमंत प्रियदर्शी यांनी सांगितलं की, मणिपूरमध्ये तैनात ईओ नवल किशोर मीना हे जयपूर जिल्ह्यातील तुंगा भागातील विमलपुरा गावचे रहिवासी आहेत. मुंडवार येथील उपनिबंधक कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक बाबूलाल मीना उर्फ ​​दिनेश खैरथल-तिजारा यालाही त्याच्यासोबत अटक करण्यात आली. पोलीस महासंचालकाच्या मार्गदर्शनाखाली दोघांची चौकशी सुरू आहे. त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे.

हेही वाचा -

  1. Legal Action Against Kiran Lohar : शिक्षणाधिकारी किरण लोहारवर कारवाई करण्याबाबत उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविणार
  2. Education Officer Arrested: शिक्षणाधिकाऱ्याला पंचवीस हजाराची लाच घेताना अटक
  3. International Anti-Corruption Day : सोलापुरात लाच घेण्यात पोलीस खाते अव्वल; दोन वर्षांत 74 जणांना लाच घेताना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details