कोल्हापुरात बंदला व्यापाऱ्यांचा पाठिंबा
LIVE UPDATES : व्यापाऱ्यांचा देशव्यापी संप; नाशिक, कोल्हापूरसह विविध जिल्ह्यांत बंदला प्रतिसाद
13:30 February 26
चंद्रपूर, जळगाव, नाशिक, यवतमाळ, हिंगोली जिल्ह्यातही व्यापाऱ्यांच्या बंदला पाठिंबा
12:26 February 26
नाशिक जिल्ह्यात बंदला प्रतिसाद
नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांचा बंदला प्रतिसाद मिळत आहे. काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. तर काहींनी काळ्या फिती लावून जीएसटी कराचा निषेध केला.
10:52 February 26
पश्चिम बंगालमध्ये व्यापाऱ्यांच्या बंदला पाठिंबा
व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंद ला पश्चिम बंगालमधूनही पाठिंबा मिळत आहे. वाढते इंधन दर, नवीन ई-वे बिल आणि जीएसटी विरोधात कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटनेने देशव्यापी बंद पुकारला आहे. त्यामुळे बंगालमधील बिरभूम जिल्ह्यातील बाजारपेठांत शुकशुकाट पाहायला मिळाला.
09:58 February 26
हिंगोली जिल्ह्यात बंदला पाठिंबा
हिंगोली- हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघने बंदमध्ये सहभागी घेतला आहे. भाजी मंडई व फळ बाजारातील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदवला आहे. बंदमुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतो आहे.
09:41 February 26
व्यापाऱ्यांच्या भारत बंदला ओडिशातून पाठिंबा
09:40 February 26
जळगावातील व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा
जीएसटी कायद्यातील जाचक त्रुटी आणि ई-वे बिलविरोधात अखिल भारतीय व्यापारी महासंघ या (कॅट) व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेने आज (शुक्रवारी) देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपाला जळगावातील व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. व्यापाऱ्यांच्या विविध संघटना आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि जीएसटी कमिशनर यांना ऑनलाइन पद्धतीने देऊन या संपाला पाठिंबा देतील. या दरम्यान, जळगावात दैनंदिन व्यवहार मात्र सुरळीत सुरू राहणार आहेत.या संपाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने देखील पाठींबा देत असल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे ई-वे बिलविरोधात आक्रमक होत माल वाहतुकदारांनीही चक्का जाम करत संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
09:28 February 26
बंदवर व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया
मोदी सरकार कुंभकर्णाच्या झोपेत, बंदवर व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया
09:20 February 26
मागण्या मान्य झाल्या नाही तर १५ मार्चपासून चक्काजाम
आज व्यापारी आणि वाहतूकदारांची दिल्लीत केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघाला नाही तर १५ मार्चपासून देशव्यापी चक्का जाम करण्याचा निर्णय घेण्याचाही विचार सुरू आहे, असे बल मिलखत सिंग यांनी सांगितले.
09:07 February 26
देशभरातील अनेक व्यापारी आणि वाहतूकदार संघटनांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे.
09:01 February 26
काय आहेत माल वाहतूकदारांच्या मागण्या ?
- ई-वे बिल कामकाजातून काढून टाकावे.
- माल पोहोचवण्यास विलंब झाल्यास वाहतूकदारांवर सरकारने कोणताही दंड आकारू नये.
- डिझेलचे दर कमी करावेत.
- देशात डिझेलच्या किंमती प्रत्येक राज्यात समान असाव्यात.
08:57 February 26
माल वाहतूक वाहने रस्त्यांवर उभी करून चक्का जाम
मुंबईसह राज्यातील 10 लाख ट्रक देशव्यापी बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
08:52 February 26
देशातील मालवाहतूक वाहनांचाही 'चक्काजाम'
मुंबई -जीएसटी कायद्यातील जाचक त्रुटी आणि ई-वे बिलविरोधात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स (कॅट) या व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेने आज (26 फेब्रुवारी) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईतील माल वाहतुकीसह व्यापारी बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह राज्यातील 10 लाख वाहनांचा चक्काजाम होणार आहे.
राष्ट्रीय व्यापार व वाहतूक बंद
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजने कॅटच्या मागण्यांना पाठिंबा देत संपात उतरणार असल्याची माहिती गुरूवारी दिली आहे. याउलट व्यापाऱ्यांच्या मागण्यांसह ई-वे बिलविरोधात आक्रमक झालेल्या माल वाहतुकदारांनीही शुक्रवारी वाहने बंद ठेवत देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. देशातील सात कोटी व्यापारी भारत बंदमध्ये सामील होतील. जीएसटी कायद्यातील अडचणीच्या व जाचक तरतुदी रद्द कराव्यात, अशी संघटनेची साधी मागणी आहे. फूड सेफ्टी ऍक्टमधील चुकीच्या तरतुदी व केंद्रीकृत अधिकार असलेली व्यवस्था रद्द करावी, टीसीएसच्या तरतुदी व्यापाऱ्यांना लागू करू नये या व्यापाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय व्यापार व वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
राज्यातील 10 लाख ट्रक सहभागी
मुंबईसह राज्यातील 10 लाख ट्रक देशव्यापी बंदमध्ये सामील होतील, असे बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन (बीजीटीए)चे सचिव सुरेश खोसला यांनी सांगितले. खोसला म्हणाले की, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि राज्यातील ट्रक वाहतूकदारांनी व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सामील होण्याचे निश्चित केले आहे. या आंदोलनात वाहतूकदार आपली माल वाहतूक वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतील व निषेध नोंदवतील. त्यामुळे 26 फेब्रुवारीला अनेक वाहतुकदारांनी भाडे रद्द केले आहे. ई-वे बिलमधील जाचक अटी रद्द करा आणि वाढत्या डिझेल किंमती कमी करा, अशा प्रमुख मागण्या माल वाहतुकदारांनी केंद्र सरकारकडे केल्याचे खोसला यांनी स्पष्ट केले.
काय आहेत मागण्या..?
- ई-वे बिल कामकाजातून काढून टाकावे.
- माल पोहोचवण्यास विलंब झाल्यास वाहतूकदारांवर सरकारने कोणताही दंड आकारू नये.
- डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात कमी करावेत.
- देशात डिझेलच्या किंमती प्रत्येक राज्यात समान असाव्यात.