महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

National Voters Day 2023 : 25 जानेवारीलाच मतदार दिन का साजरा केला जातो, काय आहे यामागील उद्देश - राष्ट्रीय मतदार दिवस

यंदा 25 जानेवारीला 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा (National Voters Day 2023) केला जात आहे. देशातील १८ वर्षांच्या तरुणांना पहिल्यांदाच मतदान करण्याची संधी मिळते. यासाठी निवडणूक आयोग मतदार दिनी अशा तरुणांना ओळखपत्र देऊन, मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करतो. 25 जानेवारी 2011 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादेवी पाटील यांनी 'राष्ट्रीय मतदार दिन' (25 January celebrated Voters Day) सुरू केला.

National Voters Day 2023
राष्ट्रीय मतदार दिन

By

Published : Jan 2, 2023, 2:18 PM IST

Updated : Jan 25, 2023, 7:19 AM IST

कोणत्याही लोकशाही देशात, सरकार बनवण्यात मतदारांचा मोठा वाटा असतो. मतदार आपल्या अमूल्य मताने एका विशिष्ट पक्षाला पाच वर्षांसाठी सत्तेवर आणतात आणि देशाच्या व राज्याच्या विकासासाठी नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडतात. पण भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात लोकांचा मतदानाकडे कल कमी आहे. मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा (National Voters Day 2023) केला जातो. यंदा 25 जानेवारीला 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा केला (25 January celebrated Voters Day) जात आहे. देशातील १८ वर्षांच्या तरुणांना पहिल्यांदाच मतदान करण्याची संधी मिळते. यासाठी निवडणूक आयोग मतदार दिनी अशा तरुणांना ओळखपत्र देऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करतो. 'राष्ट्रीय मतदार दिन' कसा साजरा केला जातो आणि का साजरा केला जातो हे जाणून घेऊया?

राष्ट्रीय मतदार दिवस :राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारत निवडणूक आयोग यंदा देशभरात 12 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणार आहे. 25 जानेवारी 2011 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादेवी पाटील यांनी 'राष्ट्रीय मतदार दिन' सुरू केला. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारीलाच साजरा केला जातो, कारण याच दिवशी 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या ६१ व्या स्थापना दिनी मतदार दिनाची सुरुवात करण्यात आली होती. 25 जानेवारी 2011 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादेवी पाटील यांनी 'राष्ट्रीय मतदार दिन' (25 January celebrated Voters Day) सुरू केला

राष्ट्रीय मतदार दिनाचे उद्दिष्ट :देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, याची जाणीव या दिवशी मतदारांना करून दिली जाते. मतदार दिन साजरा करण्यामागचा उद्देश, (Voters Day Purpose) पात्र मतदारांची ओळख करून त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. लोकशाही देशाच्या नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

मतदार दिन कसा साजरा केला जातो? (How celebrated Voters Day):मतदार दिनी, देशभरातील सर्व मतदान केंद्रे पात्र मतदारांची ओळख पटवतात. पात्र मतदारांमध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांचा समावेश आहे. या मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविल्यानंतर त्यांना निवडणूक फोटो ओळखपत्रे दिली जातात. प्रत्येक वर्षी मतदार दिनाच्या दिवशी मतदारांना मतदानाची शपथही दिली जाते, जेणेकरून ते नागरिक म्हणून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी जागरूक व्हावे.

Last Updated : Jan 25, 2023, 7:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details