महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UGC NET Exam Result : उद्या यूजीसी नेट परीक्षेचा निकाल ; 'असा' पाहा निकाल - UGC NET Exam 2022

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) उद्या शनिवारी यूजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर करणार (going to declare UGC NET exam result) आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी शुक्रवारी सकाळी घोषणा केली की, यूजीसी नेट निकाल 5 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.

UGC NET Exam Result
यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार

By

Published : Nov 4, 2022, 10:37 AM IST

नवी दिल्ली :नॅशनल टेस्टिंग एजन्सी उद्या शनिवारी यूजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर करणार (National Testing Agency) आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी शुक्रवारी सकाळी घोषणा केली की, यूजीसी नेट निकाल 5 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. यूजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर करणार परीक्षा 8, 10, 11, 12, 13 आणि 14 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात आली. यूजीसी नेट 2022 ची उत्तर की आणि अंतिम उत्तर की प्रसिद्ध झाली (going to declare UGC NET exam result) आहे.

यूजीसी नेटसाठी नोंदणी :2021 मध्ये एकूण 1266509 उमेदवारांनी यूजीसी नेटसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 671288 उमेदवार बसले होते आणि 43730 परीक्षा उत्तीर्ण झाले होते. देशभरातील विद्यापीठे आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्युनियर प्रोफेसर फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी यूजीसी नेट परीक्षा घेतली जाते. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा (UGC NET Exam 2022 ) नाही.

निकाल कसा तपासायचा ?निकाल जाहीर झाल्यानंतर यूजीसी नेटच्या वेबसाइटला भेट द्या. मुख्यपृष्ठावरयूजीसी नेट निकाल 2022 च्या लिंकवर जा.लॉगिन तपशील भरा आणि सबमिट बटण दाबा. आता निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. डाउनलोड करण्यासाठी त्यावर क्लिक करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट (UGC NET Exam Result) घ्या.

किमान उत्तीर्ण गुण :अनारक्षित श्रेणी - 40 टक्के व राखीव प्रवर्ग - 35 टक्के. उमेदवारांना प्रत्येक पेपरमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण व्हावे लागेल. पेपर 1 मध्ये अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 100 पैकी 40 गुण मिळवावे लागतील, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 पैकी 35 गुण मिळवावे लागतील. पेपर 2 मध्ये, अनारक्षित उमेदवारांना 200 पैकी 70-75 गुण प्राप्त करावे लागतील तर ओबीसी आणि इडब्ल्युएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान गुण 65 ते 70 असतील. एससीसाठी 60 ते 65 आणि एसटीसाठी 55 ते 60 (UGC NET Exam) आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details