नवी दिल्ली -आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांना आजच्याच दिवशी 1930 मध्ये रामन इफेक्ट शोधासाठी भौतिकशास्त्रासाठीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. त्या निमित्त 1987 पासून आजचा दिवस दर वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
म्हणून आज राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतात - राष्ट्रीय विज्ञान दिन लेटेस्ट न्यूज
भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. आज मानवी आयुष्यातील विज्ञानाचे महत्त्व आणि उपयोगिता याबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आजच्या दिवशी विविध कार्यक्रमांच आयोजन केले जाते.
मानवी आयुष्यातील विज्ञानाचे महत्त्व आणि उपयोगिता याबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आजच्या दिवशी विविध कार्यक्रमांच आयोजन केले जाते. 1999 पासून भारत देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबविल्या जातात. ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचे भविष्य; शिक्षण, कौशल्य आणि काम यावरचा प्रभाव’ ही यंदाच्या विज्ञान दिनाची मुख्य संकल्पना आहे.
भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम करून दाखवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी 104 उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. 21 वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे.