मुंबई : देशभरात २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सी. व्ही. रामन यांच्या कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. मात्र सी. व्ही. रामन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९८८ ला झाला आहे. तर त्यांना भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार १९३० ला मिळाला आहे. मात्र तरीही विज्ञान दिवस २८ फेब्रुवारीला का साजरा करण्यात येतो, याबाबतची माहिती तुम्हाला आम्ही या लेखातून देणार आहोत.
२८ फेब्रुवारीला का साजरा केला जातो विज्ञान दिवस :थोर भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी भौतिक शास्त्रात विविध शोध लावले आहेत. त्यामुळे त्यांनी जागतिक पातळीवर भारताचा नावलौकिक केला आहे. सी व्ही रामन यांचा जन्म तिरूचिल्लापल्ली येथे ७ नोव्हेंबर १९८८ ला झाला होता. सी व्ही रमन यांनी केलेल्या थोर कार्यामुळेच त्यांना १९३० ला भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी सी व्ही रमन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला. या शोधासाठीच प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही रामन यांना भौतिक शास्त्राचा नोबल पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशनने २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याची विनंती केली होती. त्यानंतर २८ फेब्रुवारी १९८७ ला पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला विज्ञान दिन साजरा करण्यात येतो.
कोण होते सी व्ही रमन :सी व्ही रामन यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रामन असे होते. त्यांचा जन्म तिरूचिल्लापल्ली येथील सामान्य कुटूंबात ७ नोव्हेंबर १९८८ ला झाला होता. त्यांचे शिक्षण चेन्नई येथे झाले होते. त्यांनी कोलकात्ता विद्यापीठात १९१७ ते १९३३ या कालावधीत भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही कार्य केले आहे. सी व्ही रामन हे १९४७ मध्ये रमन संशोधन संस्थेचे संचालक झाले. त्यानंतर त्यांच्या संस्थेने विविध संशोधन केल्याचे पुढे जगविख्यात आहे.