आजच्या काळात लोक आपल्या खाण्याबाबत खूप बेफिकीर झाले आहेत. आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत, त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. आरोग्य आणि आहाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत सरकारतर्फे दरवर्षी १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. दरवर्षी त्यासाठी एक थीम ठरवली जाते. आजपासून राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू( National Nutrition Week ) झाला आहे. या निमित्ताने जाणून घ्या, काय आहे या वर्षाची थीम आणि महत्त्व.( National Nutrition Week Theme and Importance ) .
हा आहे राष्ट्रीय पोषण सप्ताहाचा इतिहास -अमेरिकन डायटेटिक असोसिएशनने मार्च 1975 मध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू केला. ADA आता पोषण आणि आहार विज्ञान अकादमी म्हणून ओळखले जाते. लोकांना त्यांच्या आहार आणि आरोग्याविषयी जागरुकता देणे हा त्याचा उद्देश होता. 1980 पर्यंत, या मोहिमेला लोकांचा इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला की तो एका आठवड्याऐवजी संपूर्ण महिनाभर साजरा केला गेला. यानंतर, 1982 मध्ये, भारत सरकारने लोकांना पोषणाविषयी जागरूक करणे आणि त्यांना निरोगी जीवनशैलीसाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पोषण ( National Nutrition Week ) सप्ताह सुरू केला.