महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Shinzo Abe: जपानच्या माजी पंतप्रधानांची गोळी झाडून हत्या; भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर - National mourning in India tomorrow

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे राहिले नाहीत. क्योटोजवळील नारा शहरात एका कार्यक्रमादरम्यान ते भाषण देत असताना एका तरुणाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ( Former Japanese Prime Minister Shinzo Abe dies ) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. पीएम मोदी आणि शिन्झे आबे यांच्यात चांगले संबंध होते.

जपानच्या माजी पंतप्रधानांची गोळी झाडून हत्या; भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर
जपानच्या माजी पंतप्रधानांची गोळी झाडून हत्या; भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

By

Published : Jul 8, 2022, 7:56 PM IST

क्योटो - जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची शुक्रवार (दि. 8 जुलै)रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. क्योटोजवळील नारा शहरात शुक्रवारी एका भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळी झाडण्यात आल्याची माहिती आहे. शिंजो आबे यांच्या छातीत गोळी लागली, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ( Former Japanese Prime Minister Shinzo Abe shot ) मात्र, तोपर्यंत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी सुमारे (40 वय)असलेल्या एका संशयित हल्लेखोराला अटक केली आहे. दरम्यान, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आबे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ( National Mourning In India Tomorrow ) तसेच, आबे यांच्या निधनाबद्दल उद्या (दि. 9 जुलै)रोजी देशात राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.

माजी पंतप्रधानावर झालेल्या हल्ल्याने सर्वांनाच धक्का - गोळी लागल्याने आबे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जपान हा जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या देशांपैकी एक आहे. मात्र, या देशातील एका माजी पंतप्रधानावर झालेल्या हल्ल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या, अटक करण्यात आलेल्या संशयिताची चौकशी करण्यात येत आहे.

ते खुन्याच्या गोळीला बळी पडले, ही संपूर्ण मानवतेची शोकांतिका - शिंजो आबे यांच्या निधनावर राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. 'शिंजो आबे राहिले नाहीत यावर माझा विश्वास बसत नाही. ते एक महान राजकारणी होते आणि त्यांच्या सामाजिकतेमुळे ते जगभरात लोकप्रिय झाले होते. ते खुन्याच्या गोळीला बळी पडले, ही संपूर्ण मानवतेची शोकांतिका आहे अशी भावना केविंद यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ट्विट

भारत-जपान संबंध मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका - उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आबे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आबे यांनी काळात भारत-जपान संबंध मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आबे यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. अबे यांनी भारत-जपान संबंध दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते म्हणाले की, माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि जपानच्या लोकांसोबत आहेत.

उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू यांचे ट्विट

राष्ट्रीय शोक दिवस पाळला जाईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जपानचे माजी पंतप्रधान आबे शिंजो यांच्याबद्दल आमच्या मनापासून आदर व्यक्त करण्यासाठी 9 जुलै 2022 रोजी राष्ट्रीय शोक दिवस पाळला जाईल. तसेच, भारत-जपान संबंधांना विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या पातळीवर नेण्यात आबे यांनी मोठे योगदान दिले आहे. आज संपूर्ण भारत जपानसोबत आहे आणि या कठीण काळात आम्ही आमच्या जपानी बांधवांच्या पाठीशी उभे आहोत असही ते म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट

ही आमची शेवटची भेट असेल याची मला कल्पना नव्हती - माझ्या नुकत्याच झालेल्या जपान दौऱ्यात मला आबे यांना पुन्हा भेटण्याची आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. ते नेहमीसारखेच विनोदी आणि हुशार होते. ही आमची शेवटची भेट असेल याची मला फारशी कल्पना नव्हती. त्यांच्या कुटुंबियांना आणि जपानी लोकांप्रती माझ्या संवेदना आहेत असही पंतप्रधान म्हणाले आहेत.

शिंजो आबे यांचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत - भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हा जपान, भारत तसेच संपूर्ण जगासाठी आणि वैयक्तिकरित्या माझ्यासाठी दुःखाचा दिवस आहे. ते म्हणाले की शिंजो आबे यांचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.

डॉ. यश शंकर यांचे ट्विट

आबे हे भारताचे चांगले मित्र आणि हितचिंतक होते - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, 'अनेक वर्षांपासून आबे हे भारताचे चांगले मित्र आणि हितचिंतक होते. आपल्या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध विस्तारण्यासाठी आणि अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी बरेच काही केले आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ट्विट

धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यात त्यांची भूमिका कौतुकास्पद - काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आणि भारत-जपान संबंध मजबूत करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. राहुल गांधी यांनी ट्विट केले की, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. भारत आणि जपान यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यात त्यांची भूमिका कौतुकास्पद होती. इंडो-पॅसिफिकमध्ये त्यांनी एक भक्कम वारसा मागे ठेवला आहे. त्यांचे कुटुंब आणि जपानच्या लोकांप्रती माझ्या संवेदना.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे ट्विट

दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण करार करण्यात आले - शिंजो आबे हे सर्वाधिक वेळा भारताला भेट देणारे जपानी पंतप्रधान आहेत. आबे त्यांच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत चार वेळा भारतात आले. तसेच, ते जपानचे पहिले पंतप्रधान होते, जे 2014 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या त्यांच्या मैत्रीचीही या काळात बरीच चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांच्या काळात भारत आणि जपानमधील संबंधांनीही नवा आयाम गाठला. यादरम्यान क्योटोच्या धर्तीवर काशीचा विकास करण्यासाठी करार, बुलेट ट्रेन प्रकल्प, अणुऊर्जा, इंडो पॅसिफिक रणनीती आणि ऍक्ट ईस्ट धोरणाबाबत दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण करार करण्यात आले.

ट्विट

तब्येत बिघडल्याने त्यांनी पद सोडले - शिंजो आबे हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिले. शिंजो 2006 मध्ये पहिल्यांदा जपानचे पंतप्रधान झाले. त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी आजारपणामुळे पदाचा राजीनामा दिला. पण 2012 मध्ये ते पुन्हा जपानचे पंतप्रधान झाले आणि 2020 पर्यंत ते या पदावर राहिले. आजारपणामुळे त्यांनी आपले पद सोडले. यादरम्यान, त्यांनी सांगितले की, माझ्या आजारपणामुळे निर्णय प्रक्रियेत अडथळा येऊ द्यायचा नाही आणि त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण न केल्याबद्दल जपानी लोकांची माफी मागितली होती. आबे अनेक वर्षांपासून अल्झायमर कोलायटिसने त्रस्त होते. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी पद सोडले. त्यांच्या जागी योशिहिदे सुगा नवे पंतप्रधान झाले.

ट्विट

हल्लेखोर कोण होता?जपानची वृत्तसंस्था (NHK) च्या माहितीनुसार, संशयित हल्लेखोर शिंजो आबे यांच्यावर नाराज होता आणि त्याने आबेंना ठार मारण्याच्या उद्देशानेच गोळी झाडली. तसेच, रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्लेखोर शिंजो आबे यांच्या कामावर नाखूष होता, त्यामुळे त्याला आबेंना जीवे मारायचे होते, असं त्याने पोलिसांना सांगितले आहे.

शिंजो आबे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती -शिंजो आबे यांचा जन्म (1954)मध्ये एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिंतारो आबे हे जपानचे परराष्ट्र मंत्रीपदी राहीले होते. शिंजो आबे यांचे आजोबा नोबुसुके किशी हे जपानचे पंतप्रधान होते. दुसऱ्या महायुद्धानंतर (2006) साली शिंजो आबे जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. मात्र त्यांनी त्याच वर्षी राजीनामा दिला. पुढे ते 2012 पासून 2020 पर्यंत जपानच्या पंतप्रधानपदी होते. आरोग्याच्या समस्यांमुळे आबे यांनी 2020 मध्ये राजीनामा दिला होता. मात्र, तरीही आबे हे त्यांच्या पक्षात सर्वाधिक लोकप्रिय होते.

बंदूक बाळगण्याबाबत अतिशय कडक कायदे असणाऱ्या देशांपैकी एक जपान - हायप्रोफाईल लोकांची हत्या करणे किंवा हत्येचा प्रयत्न करणे ही जपानसाठी नवी गोष्ट नाही. (1932) मध्ये जपानचे पंतप्रधान इनुकाई सुयोशी यांची एका नौदल अधिकाऱ्याने हत्या केली होती. तो अयशस्वी बंडाचा एक भाग होता. बंदूक बाळगण्याबाबत अतिशय कडक कायदे असणाऱ्या देशांपैकी एक जपान आहे.

हेही वाचा -Vikram Chiyan hospitalized: हृदयविकाराचा झटका आल्याने विक्रम चियान रुग्णालयात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details